Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर यांची कामगीरी फ्रॉड लोन अॅपचे कॉल सेंटर उध्वस्त …..

पंकेश जाधव by पंकेश जाधव
October 2, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर यांची कामगीरी फ्रॉड लोन अॅपचे कॉल सेंटर उध्वस्त …..
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

गुलाब सोनी पुणे शहर प्रतिनिधी…

सायबर क्राईम पो स्टे पुणे शहर

गुगल ऑनलाईन लोन अॅप्लीकेशन वरुन इस्टंट लोन देण्याच्या नावाखाली काही अॅप्लीकेशन प्ले स्टोअर तसेच खाजगी वेबसाईटवर नागरिकांना डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करुन दिले जातात. सदरील लोन अॅप्लीकेशन्सद्वारे युजरला किमान 500/- रुपयापासुन ते कमाल 7000/- रुपयापर्यंतचे तात्काळ कर्ज दिले जाते. नमुद

लोन अॅप्लीकेशन्स युजरच्या हॅन्डसेट मध्ये डाऊनलोड करुन ते चालु झाल्यानंतर युजर हॅन्डसेटचा Camera, Contacts, Location, Sms, Storage, Microphone, gallary या परमिशन Allow करण्याचा मेसेज मोबाईलच्या होम स्क्रिन वर प्राप्त होतो. या सर्व परमिशन युजरने दिल्यानंतर युजरच्या हॅन्डसेट मधील सर्व डेटाचा अॅक्सेसन मुदलोन अॅप्लीकेशन पुरविणाऱ्या कंपनीस जातो. सदर डेटाचा ॲक्सेस मिळाल्यानंतर तो सर्व डेटा नमुद कंपनी क्लोन करुन त्याच्या सर्व्हरवर साठवुन ठेवले. कर्जाची रक्कम प्रोसेसिंग फी वजा करुन ] युजरचे अकाऊंट मध्ये डिपॉझिट झाल्यानंतर 7 दिवसाचे आतल्यावर 30 ते 300 टक्क्यापर्यंत अधिकचे व्याज आकारुन त्याची परतफेड करण्यास सांगतात. युजरने जर कर्जाची रक्कम व त्यावरील आकारलेले मुद्दल व व्याजाची रक्कम भरुन देखील कंपनीने नेमलेल्या कॉलर कडुन युजरला पुन्हा पैसे भरण्यासाठी कॉल येण्यास सुरुवात होते. या कॉलवर सक्तीने पैसे भरण्यासाठी मानसिक त्रास दिला जातो. दरम्यान पैसे भरण्यास उशीर झाल्यास लोन अॅप्लीकेशन कंपनीद्वारे युजरच्या माहितीचा (फोटो कॉन्टॅक्टनंबरइत्यादी) गैरवापर करुन कर्ज फेडकरणाऱ्याचा मानसिक छळ केला जातो. यामध्ये लोन अॅप वापरकर्त्याचे वैयक्तीक फोटो घेवुन व त्याचे मॉर्फी ( अर्धनग्न / नग्न स्वरुपाचे मॉर्फिग) करुन, वापरकर्त्याच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मधील लोकांना कॉल करुन धमकी, शिवगाळ करुन, तसेच टेक्स्ट मॅसेजस, व्हॉटसअॅप मॅसेजेस पाठवुन, लोन अॅप वापरकर्त्याची बदनामी केली जाते. व त्यांच्याकडुन बदनामी न करण्यासाठी वारंवार खंडणी मागुन मोठ्या प्रमाणात पैसे घेण्याचे काम केले जाते. या बदनामीची भीतीपोटी लोन अॅप वापरकर्ता हा सदर लोन अॅप कंपनीने सांगितलेल्या बँक अकाऊंटवर / VPA ID / UPI ID यावर ऑनलाईन पैसे पाठवितात.

सदर प्रकारचा सायबर गुन्हा संपुर्ण भारतामध्ये होत असुन एकट्या पुणे शहरात सन 2020 ते 2022 (30 ऑगस्ट पावेतो) सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे 4778 एवढया मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल झालेल्या आहेत. सदर प्रकरणाची वरीष्ठ स्तरावर गांभीर्याने दखल घेवुन त्याचा सविस्तर तपास करण्याच्या दृष्टीने सायबर पोलीस स्टेशन कडे ऑनलाईनलोन अॅप्लीकेशन फसवणुकी संदर्भात गु.र.नं. 21/2022 भा.द.वि. कलम 384,385,386, 420,469, 500,501, 504,506, 120 (ब), 34 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 43 (1) / 66.66 (डी).67 प्रमाणे व गु.र.नं. 32/2022 भा.दं.वि. कलम 384, 385, 386, 420, 469,500,501, 504, 506, 1208, 34 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 43 (a ) / 66,43 (b) /66, 66 (D), 67 प्रमाणे दोन गुन्हे दाखल केले होते…

दाखल गुन्हयाच्या तपासा दरम्यान तक्रारदार यांनी डाऊनलोड केलेले लोन अॅप्लीकेशन तसेच कर्जाची रक्कम ज्या बँक अकाऊंट वर भरली ते बँक अकाऊंट, तक्रारदार यांना कॉल करण्यासाठी वापरण्यात आलेले मोबाईल क्रमांक, बँक अकाऊट / VPA ID / UPI ID इत्यादींची माहिती मिळवुन त्या माहितीचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. नमुद माहितीच्या तांत्रिक विश्लेषणातून पुढे आलेल्या माहितीच्या आधारे आरोपी निष्पन्न करुन सायबर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने गुन्हयात वापरलेले बँकचे चालु खाते ज्या आरोपींनी लोन अॅप्लीकेशन कंपन्यांना पुरविले त्यांचा खराडी परिसर पुणे, सोलापुर शहर व बेंगलोर येथे शोध घेवुन पुढील आरोपी अटक केले आहेत.

आरोपी 1. स्वप्नील हनुमंत नागटिळक, वय 29 वर्षे, सध्या रा. पापाराम नगर, विजापुर रोड, सोलापुर, मुळ राहणार वसाहत नं 2 चाँद तारा मस्जिद समोर, विजापुर सोलापुर. 2. श्रीकृष्ण – भिमण्णा गायकवाड, वय 26 वर्षे, रा. फ्लॅट नं 401, शिवशक्ती चौक, त्रिवेणीनगर, भेकराई नगर, – फुरसुंगी, हडपसर, पुणे 3. धिरज भारत पुणेकर, वय 36 वर्षे, रा. संजय नगर, कुमठे नाका, घर नंबर -74, सोलापुर. 4. प्रमोद जेम्स रणसिंग, वय 43 वर्षे, रा. प्रियदर्शनी सोसायटी, फ्लॅट नंबर 4, मुमताज नगर कुमठे नाका, सोलापुर. 5. सॅम्युअल संपत कुमार, वय- 40 वर्षे, रा. 404 एम.बी.आर सुर्वे अपार्टमेंट डिकोजा रोड, बेलातुर, बेंगलुरु. 6. मुजीब बरांद कंदीयल पिता इब्राहिम वय – 42, रा. बरादियल हाउस अरूर पोस्ट, पूरामेरी कोझीकोडे अरुर केरळ 673507 7. मोहम्मद – मनियत पिता मोहिदू वय 32, रा. मनियत हाउस ता. पडघरा जि. कनिकत केरळ यांना 10 दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे. या आरोपींनी पुणे शहर, सोलापुर शहर, लातुर, जळगाव, बेंगलोर इत्यादी ठिकाणी मजुर लोकांच्या नावे बँकेत चालु / बचत खाते उघडुन त्याचे चेकबुक एटीएम कार्ड रजिस्टर असणारे सीम कार्ड इत्यादी स्वतःच्या ताब्यात घेवुन बँकेचा इंटरनेट बँकींग चालु करुन त्याचा आयडी पासवर्ड वरील कागदपत्रे ही लोन अॅप्लीकेशन कंपनीस पुरवित होती. तसेच मजुर लोकांच्या नावे एकत्रीत मोठ्या प्रमाणात मोबाईल सीम कार्ड खरेदी करुन ते सीम कार्ड कॉल सेंटर वापरासाठी लोन अॅप्लीकेशन कंपनीस पुरवित होते.
सदर आरोपींना अटक त्यांच्या कडुन पुढील प्रमाणे मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. मोबाईल हॅन्डसेट सीमकार्ड सह 48, बँक अकाऊंट 56, सीम कार्ड संगणक 1, लॅपटॉप 1, चेकबुक / पासबुक 27 एअरटेल व व्हीआय कंपनीचे मोकळे सीम कार्ड 30 डेबीट / क्रेडिट कार्ड 167. पेटीएम स्वाईप मशीन 1 पॅनकार्ड 15, आधारकार्ड 11, मतदार कार्ड 04, शिक्के04. –

तसेच GB lend व Handy Loan या सारख्यान अॅप्लीकेशन वरून तक्रारदार याने लोन घेतले बाबत वारंवार धमकीचे, अश्लिल मेसेजेस/कॉल येत होते. सदर कॉलींग मोबाईल नंबरचे गुन्ह्याच्या अनुशंगाने तांत्रिक विश्लेषण करुन बँगलोर या ठिकाणी कॉल सेंटर असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर बेंगलोर या ठिकाणी सायबर पोलीस स्टेशन मार्फत 3 अधिकारी व 10 अंमलदार असे तपास पथक पाठवुन कॉल सेंटरवर छापा टाकण्यात आला. सदर ठिकाणी पुढील आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले. 1. विघ्नेशमंजुनाथ, वय 19 वर्षे, रा. 786, 27 मेन, 1 क्रॉस, नंदिनीलेआऊट, बँगलोरनॉर्थ, पिननंबर 560096. 2. गणेश सुब्बारायडु वय 26 वर्ष, रा. घरनंबर 62, दुसरामजला, चांबराजपेठ, बेंगलोर, नॉर्थ पिन नंबर 560018 3 आकाशएम. व्ही. वय- 19 वर्षे, रा 24, 4 क्रॉस एच. एम. नायक रोड, जय मारुती नगर, बैंगलोर उत्तर कर्नाटक 560096. 4. श्रद्धा सुधाकर गौडा, वय 25, रा – सुकुमार हाऊस, घर क्रमांक- २२ नयाधल्ली, मैसोर रोड मेट्रो लेआउट जवळ, 2 क्रॉस, पहिला मजला, बंगलोर उत्तर कर्नाटक पिन कोड 5600965 पार्वती संतोष दास, वय 39 वर्षे, रातुलाग्राम – पथ -2, पोस्ट सोनईमुख, सोनई, कचर, आसाम 788119 6. अश्विनी डी मुरुगन, वय- 24 वर्षे, –

रा जय भुवनेश्वरी नगर, नंदिनी लेआउट, बंगलोर उत्तर कर्नाटक- 560096, 7. शिल्पा सुभाष गौडा, वय- 25 वर्षे, R/o- 8, पहिला मुख्य, 3रा क्रॉस, नाजरसप्पा लेआउट, नगरभवी, मुख्य रस्ता, बंगलोर उत्तर, कर्नाटक पिन कोड क्रमांक 560072 8. प्रिया एस. वय 23 वर्ष, रा 532, अंगलपरमेश्वरी रोड, सरकारी शाळेजवळ, जय भुवनेश्वरी नगर, नंदिनी लेआउट, बंगलोर उत्तर, पिन कोड क्रमांक 560096 9. दिपीकाएल, वय 20 वर्षे, R/O H. क्रमांक 319, 10 वी क्रॉस, 2रा मैन, SRS स्कूल जवळ, 2रा ब्लॉक, नंदिनी लेआउट, बंगलौर उत्तर कर्नाटक 560096. तसेच बेंगलोर येथे दुसऱ्या ठिकाणाहुन कॉल सेंटरचे काम करणारे 10. सय्यद अकीब पाशा, वय – 23 वर्षे, रा. गंगा मोगली रोड, लस्सी शॉप जवळ, हसकोटे, बेंगलोर, कर्नाटक- 562114 11. मुबारक

अफरोज बेग, वय 22 वर्षे, रा. न्यु चैतन्य हॉस्पीटल जवळ, हसकोटे बस स्टॉप जवळ, हसकोटे, बेंगलोर, कर्नाटक यांना अटक केली असुन त्यांना 9 दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे. सदर कॉल सेंटरचे काम करणारे आरोपी हे लोन अॅपचे कर्ज घेतलेल्या लोकांना कॉल करुन अश्लिल भाषा वापरुन शिवीगाळ करुन तसेच धमकी देण्याचे मेसेजेस व कॉल करण्याचे काम करत होते. त्याच्याकडे लोन अॅप कंपनी मार्फत लोन अॅपचे कर्ज घेतलेल्या हजारो लोकांचा खाजगी डेटा हा त्यांच्या कडील जप्त डिजीटल डिव्हाईसे व कागदपत्रां मध्ये मिळुन आला. सदर कॉल सेंटरवर 16 पेक्षा

जास्त लोन अॅप्लीकेशनचे कामकाज चालत होते व त्यांचा डेटा मिळुन आलेला आहे.

कॉल सेंटरवर व आरोपीच्या ताब्यात पुढील प्रमाणे मुद्देमाल मिळुन आला. 1)10 सिमकार्ड, 2) हजेरी रजिस्टर, 3) ओळखपत्र, 4) लेटरहेड, 5) नोंद वही, 6) डिव्हीडी (Degital Compact Disk), 7) 15 कंप्युटर, 8) इंटरनेटकनक्टरस्विचमशीन, 9) 3 इंटरनेट राऊटर, 10) पिडीतांचे मोबाईल क्रमांकाचे चार्ट, 11) 50 इनव्हाईस फाईल्स 12 ) 10 मोबाईल फोन 13 ) हेडफोन इत्यादी वस्तु जप्त करण्यात आल्या.

सायबर पोलीस स्टेशनकडुन सदर लोन अॅप फ्रॉड करणाऱ्या कंपन्यांचे वापरण्यात आलेले बँक अकाऊंट (VPA/UPI यांची माहिती काढुन बँकाशी तात्काळ संपर्क करुन त्यांचे बँक अकाऊंट गोठविले आहे. त्याद्वारे एकुण 69,27,059/- रुपयेपेक्षा जास्त रक्कम वाचविण्यात सायबर पोलीस पुणे शहर यांना यश मिळाले आहे.

दाखल गुन्हयातील एकुन अटक 18 आरोपीतां कडील तपासामध्ये नमुद लोन अॅप कंपनीचे आणखी मोठ्या प्रमाणावर कॉलसेंटर चालु असुन वेगवेगळ्या राज्यांमधुन सदरकामासाठी लागणारे बँक अकाऊंट मिळविणारी टोळी देखील कार्यरत असल्याचे निष्पन्न होत आहे. सदर लोन अॅप यांना सीमकार्ड पुरविणारी टिम, लोन अप बनविणारी टेक्नीकनटिम, बँक अकाऊंट पुरविणारी टिम, कॉल सेंटरचे काम करणारी टिम, पैशाचे व्यवहार हाताळणारी टिम असे वेगवेगळ्या कामकरणाऱ्या वेगवेगळ्या टोळ्या देशभरात कार्यरत आहेत. सदर टोळ्यांचा शोध घेण्याच्या अनुशंगाने सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे कडुन दाखल गुन्हया मध्ये सखोल तपास करण्यात येत आहे.

वरील कामगीरी श्री अमिताभ गुप्ता मा. पोलीस आयुक्त, श्री. संदिप कर्णिक, मा. पोलीस सह. आयुक्त श्री. रामनाथ पोकळे मा. अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे), मा. आग्यश्री नवटके मा. पोलीस उप आयुक्त ( आर्थिक व सायबर गुन्हे), श्री. विजय पळसुले मा. सहा पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शना खाली व पो नि दगडु हाके (सध्या नेमणुक वारजे माळवाडी पोस्टे) व पो नि मिनल सुपे पाटील, पोनि कुमार घाडगे, पो नि अंकुश चिंतामण, स पो नि शिरिष भालेराव, स पो नि बलभीम ननवरे, सपोनि किरण मदने, सपोनि कदिर देशमुख, पो उप नि अनिल डफळ, पो उप नि आनंदराव ढवळे, पो उप नि संदिप कदम पो उप नि सचिन जाधव, पो उप नि प्रविण भोपळे, पो उप नि चित्रा चौधरी, पो उप

नि धनाजी टोणे, पो उप नि अंगद नेमाणे, पो उप नि सुभाष माने, पो हवा संदेश कर्णे, पो हवा अस्लम आतार, पो हवा मानसी मोरे, पो हवा मंगेश जेवसे, पो ना किरण जमदाडे, पो ना सोनुने, म पो ना जान्हवी भडेकर, म पो ना निलम साबळे, पो ना नवनाथ कोडे, पो ना रविंद्र साळवे, पो शि शिरिष गावडे, म पो शि पूजा मांदळे, पौ शि राज चव्हाण, पो शि नितेश शेलार, पोशि संतोष जाधव, पोशि अनिकेत भिंगारे, पोशि अनिल पुंडलिक, पो शि योगेश वाव्हळ, पो शि प्रसाद पोतदार, पोशि नितीन चांदणे, पो शि नवनाथ जाधव, म पो शि कौशल्या भागीरे, पो शि दिनेश मरकड, पो शि सचिन वाजे, पोशि प्रविण राजपुत, पोशि आनंद भंडलकर, पोशि अमोल कदम, पो शि सतिश बिरादार यांनी केली.

Previous Post

पुणे: सम्यक साहित्य परिषदेचा ३० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा; सम्यक साहित्य परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशन.

Next Post

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या शब्दात “गांधी’ किया बदनाम हमीने”…!

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या शब्दात “गांधी’ किया बदनाम हमीने”…!

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या शब्दात "गांधी' किया बदनाम हमीने"…!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In