आशिष अंबादे वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील संत तुकडोजी वार्ड म्हाडा काॅलीनी समोर मागील एक वर्षा पासून नळाला सुरळीत पाणी येत नाही. त्यामुळे नागरिकाना पाण्यासाठी वणवण भटकाव लागते आहे. हिंगणघाट नगर परिषदकडे दुसरा कोणताही उपाय किंवा साधन या प्रभागा मध्ये उपलब्ध नाही. त्यामुळे परिसरातील नागरिक आक्रमक भूमिका घेत आज नगर परिषद वर मोर्चा काढला.
आम्ही कर भरणा नियमित भरत असून सुध्दा आम्हाला पाण्यासाठी वणवण भटकाव लागत आहे तरी आम्हचा मागणीचा विचार करून पाण्याची समस्या लवकरात लवकर सोडवीण्यात यावी. व भारत ठाकरे यांच्या घरा जवळील बोंरीगची मरमत करण्यात यावी अशे निवेदन मुख्यधिकारीनगर परिषद हिंगणघाट याना देण्यात आले.
यावेळी प्रतिभा मोहाड, पुजा अबरवेले, सारीका साव, ज्योती पुसदेकर, शोभा फरकाडे, मिना श्रिरसागार, मीनाक्षी खारखाटे, सुषमा खारखाटे, शिला अबरवेले, सुमित्रा धोटे, प्रमोद पाणतावणे, लता तेलहाडे, माला येडे, आशाताई रघाटाटे, रजनी वैरागडे, सुनीता यादव, प्रमोद भोयर वैशाली, रघाटाटे, कोकीळा दिवे, प्रमोद पाणतावणे, अरूण बोबडे सह वार्डतील नागरिक उपस्थिति होते.

