Wednesday, February 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home वर्धा

गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा, गरजू रुग्णांना चष्म्यांचे निःशुल्क वितरण, नारायण सेवा मित्र परिवाराचा स्तुत्य उपक्रम.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
May 20, 2025
in वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा, गरजू रुग्णांना चष्म्यांचे निःशुल्क वितरण, नारायण सेवा मित्र परिवाराचा स्तुत्य उपक्रम.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथील नारायण सेवा मित्र परिवाराच्या वतीने दिनांक १५ मे २०२५ रोजी धनश्री नेत्रालयाच्या प्रांगणात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि गरजू रुग्णांना चष्मा वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पी.वी टेक्सटाईल जामचे संचालक आदर्श मोहता होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रमेश करवा, डॉ. संजय ओस्तवाल, उद्योगपती अशोक मिहाणी, पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. किरण वैद्य, नारायण सेवा मित्र परिवाराचे अध्यक्ष महेश अग्रवाल यांची उपस्थिती होती.

यावेळी डॉ. संजय ओस्तवाल आणि डॉ. रमेश करवा यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली आणि त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. अध्यक्षीय भाषणात आदर्श मोहता यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

या कार्यक्रमादरम्यान, इयत्ता १० वी (एसएससी) आणि इयत्ता १२ वी (एचएससी) च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये पियुष विनोद डंभारे, कु. जान्हवी गजानन ठाकरे, कु. राखी राजेश राठोड, कु. मनस्वी मोहन ठाकरे, निलेश विजय यादव, कु. सृष्टी प्रदिप डफळे, कु. योगेश्वरी डेकाटे आणि देवांश अजय भांडे या विद्यार्थ्यांचा समावेश होता. याव्यतिरिक्त, वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. आकाश रमेश करवा आणि यशस्वीरीत्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्याबद्दल डॉ. संजय ओस्तवाल यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच जेम्स सॅम्युअल, अजय कुमार यादव, प्रदीप जोशी, शेळके, भारत पाटील, वैशाली पोळ, सुनील फुटाणे या मुख्याध्यापकांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात, नारायण सेवा मित्र परिवाराने आयोजित केलेल्या निःशुल्क नेत्र तपासणी शिबिरातील ५४ मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या गरजू रुग्णांना मान्यवरांच्या हस्ते चष्म्यांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. किरण वैद्य यांनी केली, संचालन दुर्गाप्रसाद यादव तर आभार पराग मुडे यांनी मानले. या यशस्वी कार्यक्रमासाठी नारायण सेवा मित्र परिवाराचे सदस्य, शहरातील नागरिक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी मोलाचे योगदान दिले.

Tags: गरजू रुग्णांना चष्म्यांचे निःशुल्क वितरणगुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळानारायण सेवा मित्र परिवाराचा स्तुत्य उपक्रम.
Previous Post

गडचिरोलीत अनधिकृत HTBT कापूस बियाण्याचा साठा सापडला; एक अटकेत, तेलंगणातील तस्कर फरार.

Next Post

दत्तकाने घडवलेले भविष्य: अनाथांना मिळाले नवे पंख, आमदार समीर कुणावार यांनी केला हृदय सत्कार

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
दत्तकाने घडवलेले भविष्य: अनाथांना मिळाले नवे पंख, आमदार समीर कुणावार यांनी केला हृदय सत्कार

दत्तकाने घडवलेले भविष्य: अनाथांना मिळाले नवे पंख, आमदार समीर कुणावार यांनी केला हृदय सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In