माजी पंचायत समितीचे सभापती भास्करभाऊ तलांडे यांचे शुभहस्ते नवीन जणीत्रचे भूमिपूजन
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
अहेरी तालुक्यातील राजाराम (खां)येते वार्ड क्रमांक तीन येथील दलित वस्तीत नेहमी कित्येक वर्ष्यापासून सातत्याने कमी दाबाचा विद्युत होत होती त्यामुळे भास्कर तलांडे विद्यमान सभापती असताना पंचयात समितीचा ठराव व ग्राम पंचायत ठराव घेवून संबधित अधिकारी यांना बोलवून जागा उपलब्ध करून दिले त्यानंतर जणीत्र मंजूर करून सुद्धा महावितरण विभागाकडून कार्यरंभा आदेश कडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत होते. त्या संदर्भात शिवसेना युवानेता संदीप भाऊ कोरेत यांना दलित वस्तीतील नागरिक कमी दाबाचा पुरवठा बद्दल निवेदन देण्यात आले होते, त्या निवेदन ची दखल घेत विद्युत उपविभागीय जिमलगट्टा येथे जाऊन कनिष्ठ अभियंता मंगेश शेडमाके जिमलगट्टा
कार्यालयात जाऊन विद्युत समस्या बद्दल चर्चा करून आठ दिवसात नवीन जणीत्रचे काम सुरुवात करू असे आस्वासन देण्यात आले आहे, व उपकार्यकारी अभियंता श्री, देवतडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक २१/०६/२०२५रोजी बुधवार ला राजाराम येतील दलित वस्तीत नवीन जणीत्रचे उदघाटन करण्यात आले आहे. या वेळी उपस्थित माजी पंचायत समितीचे सभापती भास्करभाऊ तलांडे,उपकार्यकारी अभियंता श्री, देवतडे आलापल्ली,कनिष्ठ अभियंता मंगेश शेडमाके जिमलगट्टा ठेकेदार मनोज पिपरे,वरिष्ठ तंत्रज्ञ् उमेश खोबरे,कमलापूर वरिष्ठ तंत्रज्ञ, कोडापे,राजाराम योगेश आलाम,उपस्थित होते तर,दलित वस्तीतील नागरिक साईनाथ दुर्गे, भिमराव गोंगले,मधुकर गोंगले, तुळशीराम झाडे, सुधाकर गोंगले, रवि दुर्गे, राजेश दुर्गे, विलास दुर्गे, संतोष दुर्गे, व्यंकटेश गोंगले, नंदू बामनकर, हणमंतु झाडे, धनंजय शेगावकर, बापू दुर्गे, श्रीनिवास झाडे,आदी दलित वस्तीतील नागरिक उपस्थित होते. होते श्री. संदीप भाऊ कोरेत व श्री,भास्कर भाऊ तलांडे, सामाजिक कार्यकर्ते श्री अमित भाऊ बेझलवार याची दलित बांधवाकडून आभार मानले आहे.

