अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- जवाहर कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावनेर येथे नुकत्याच जाहीर झालेल्या वर्ग दहावी च्या निकालाची परंपरा राखत यावर्षी सुद्धा खालील विद्यार्थिनींनी क्रमांक प्राप्त केलेले आहे कु.रेशमा अलोने ८७.४०, कु.भैरवी ढाले ८६.८०, कु.सोनाली सुरजुसे ८२.४०, कु.हिमांशी वडे ८२.२०, कु.आरुषी कनेरे ७९.६०, कु. देविका बाडबुदे ७४.२०, कु. सेजल पवार ७२.४०, कु. गुंजन घोटेकर ७२.०० याप्रसंगी विद्या प्रसारक मंडळ सावनेरचे अध्यक्ष विजयराव डाहाके, सचिव नरेंद्र डाहाके, उपाध्यक्ष मदन डाहाके, सभासद यशपाल डाहाके, सोनाली डाहाके शाळेच्या मुख्याध्यापिका सरोज अटाळकर, ज्येष्ठ विज्ञान शिक्षक मिलिंद देशमुख तसेच सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थिनींनी यशाचे श्रेय संस्थेचे सर्व पदाधिकारी, शाळेच्या प्राचार्य तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि आई वडील यांना दिले.

