राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी :- 2 आक्टोंबर हा दिवस सपूर्ण भारतात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
गोंडपिपरी तालुक्यातील पचांयत समीती अंतर्गत येत असलेल्या डोंगरगाव येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. जय जवान, जय किसान असा नारा देणारे माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती दिनी त्यांची फोटोच न लावता जयंती साजरी करण्यात आली. त्यामुळे शाळा प्रशासनावर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
आज या जयंती साठी ग्रामपंचायत डोंगरगाव व जि प शाळा डोंगरगाव येथे चक्क लालबहादू शास्त्री यांचा फोटोच नाही. हि एक शोकांतिका आहे. ज्या ग्राम पंचायतला व शाळेला जर जयंती साजरी करण्यासाठी फोटो नसेल तर ग्रामपंचायत गावाला व शिक्षक विद्यार्थीना काय संबोधीत करतील हा एक विषयच आहे.