अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो. नं.-९८२२७२४१३६
सावनेर,02ऑक्टोंबर:- सावनेर नगरीत गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंतीचे औचित्य साधून समर्पण फाउंडेशनच्या वतीने प्रगती दुर्गा उत्सव मंडळ होळी चौक येथे भव्य दिव्य ब्लड कॅम्प व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मा.श्री.डॉ.राजीवजी पोद्दार यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख उपस्थिती मध्ये सोनबाजी मुसळे, विनोद जैन, नितीनजी राठी, प्रकाश टेकाडे, किशोर गुरारीकर, मोहन कामदार, तेजसिंग सावजी, विजय देशमुख, दीपक कटारे व मनोहर घाेळसे उपस्थित होते. सकाळी ९ वा. पासून तर ५ वा. पर्यंत जीवन ज्योती ब्लड बँक नागपूरच्या सहकार्याने कॅम्प मध्ये ६५ लोकांनी रक्तदान केले. तसेच रोग निदान शिबीरामध्ये ९०० च्या वर लोकांनी उपचार घेतले व औषधी वितरण करण्यात आली.
या शिबिरात शहरातील तज्ञ चिकित्सकांकडून शिबिरात आलेल्या रुग्णांची योग्यरीत्या तपासणी करून त्यांना औषध देखील देण्यात आले. शिबिरात नेत्र तपासणी, दंत तपासणी, मूखरोग तपासणी, अस्थिरोग तपासणी, हृदयरोग तपासणी, मधुमेह तपासणी, रक्तदाब तपासणी, स्त्रीरोग तपासणी, बालरोग तपासणी, जनरल तपासणी, होमिओपॅथिक, औषधोपचार आयुर्वेदिक औषध उपचार इत्यादी सेवा पुरविण्यात आल्या या शिबिरामध्ये शहरातील ज्येष्ठ चिकित्सक डॉ. कृष्णराव भगत, डॉ. नितीन पोटोडे, डॉ. स्वप्नील काळे, डॉ. शिवम पुण्यानी, डॉ. आशिष चांडक, डॉ. निलेश कुंभारे, डॉ. प्रवीण चव्हाण, डॉ. अनुप जैस्वाल, डॉ. नेहा जयस्वाल, डॉ. उमेश गायकवाड, डॉ. घाटोळे यांनी सेवा दिल्या. या स्वास्थ शिबिराचे समन्वयक समर्पण फाउंडेशनचे डॉ. विलास मानकर, डॉ. नितीन पाेटोडे, डॉ. राहुल दाते होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता प्रगती दुर्गा उत्सव मंडळ व समर्पण फाउंडेशनचे कार्यकारी मंडळांमध्ये रवींद्र देशमुख, तेजरामजी बोरेकर, प्रवीण रासेकर, तुषार उमाटे, भूषण कामडी, प्रवीण कराेले, रिंकेश उमाटे, विलास उमाटे, शेखर वाट, तुळशीराम बनकर, हरीश चापेकर, धनराज शास्त्री, तुळशीराम बनकर, विशेष मार्गदर्शन-मदंनजी उमाटे, बाळकृष्णाजी गावंडे, अशोकभाऊ ऊमाटे, संजय जवाहर, कपिल बोबडे, प्रशांत घोळसे, रितेश बनकर, रामाजी वाडबुधे, विनोद घटे, विकी उमाटे, भोजराज सोमकुसरे, गणेश लांडगे, विनोद बागडे, प्रवीण नारेकर, अभिषेक मुलमुले, अभिषेक गहरवार, मनीष चित्तेवान, प्रमोद ढोले, नरेंद्र ठाकूर इत्यादींनी प्रयत्न केले.