मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारत माध्यमिक विद्यालय हिंगणघाट येथे शैक्षणिक सत्र 2025 – 2026 च्या प्रथम सत्रातील शिक्षक पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर प्रोग्रेसिव्ह अेज्युकेशन संस्थचे सहसचिव संजय देशपांडे, शाळेचे मुख्याध्यापक हरिष भट्टड, उपमुख्याध्याप किशोर चवरे, पर्यवेक्षिका निलाक्षी बुरिले, मनिषा कोंडावर पालक शिक्षक संघाच्या माता पालक ममता येलके, प्रांजली खेरे, विलास नंराजे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी शैक्षणिक सत्र 2025 – 2026 करिता पालक शिक्षक संघ व माता पालक संघाची निवड करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातुन हरिष भट्टड यानी विद्यालयात चालणारे विविध उपक्रमा बाबत माहिती दिली. शाळेची उत्तरोत्तर होत असलेली प्रगती तसेच शाळेमार्फत वेळोवेळी आयोजित केले जाणारे विविध उपक्रम याबाबत माहिती हरिष भट्टड यांनी पालकांना दिली. तसेच भारत विद्यालयात 6 तालुक्यातून विद्यार्थी शाळेत येतात त्यामुळे वर्ग 5 ते 8 वी च्या विध्यार्थ्यांकरिता बसस्थानक ते भारत विद्यालय बसची व्यवस्था केली आहे. वर्ग 5 वी करिता निपुन भारत अभियान, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -2020’ च्या पंचपदीनुसार पाठ नियोजन व राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण क्षेत्रात होणारे बदल अंगीकारून विद्यार्थ्यांना जीवनमूल्ययुक्त, गुणवत्तापूर्ण, समग्र विकासात्मक तसेच सर्वांगीण विकासाला चालना देणारे शिक्षण दिले जाते. तसेच भारत विद्यालयास माझी शाळा सुंदर शाळा पुरस्कार प्राप्त झाला असल्याचे सांगितले.
याप्रसंगी संजय देशपांडे विचार व्यक्त करताना म्हणाले की आई पहिली गुरु असुन आईने देखिल विद्यार्थांना रोज वाचन घेण्याची गरज आहे. शिक्षणा सोबत संस्कार देण्याचे काम आमची शाळा करते. आई वडिल घरात निट वागणे तेथुनच संस्काराची सुरवात होते. बालक पालक व चालक यांच्यात सुसंवाद असावा यायाठी सर्वानी पालक सभेला आवर्जुन उपस्थित राहावे असे आव्हान केले. शिक्षक मनोगत अर्चना सुरपाम यांनी व्यक्त केले. याप्रसंगी पालक प्रतिनिधी ममता येलके व प्रांजली खेरे यानी सुध्दा मार्गर्शन केले. तसेच माता पालका मधुन नरेश पंपन्नवार, राधा बावणे, संदीप उईके , पाडुरंग बावणे, लीना आगुरवार यानी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे संचालन सोनाली पातोंड यानी तर आभार प्रर्दशन उपमुख्याध्यापक किशोर चवरे यानी केले.

