मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- ओबीसी संघटनांच्या सहयोगाने मंडल जनगणना यात्रा संयोजक उमेश कोराम यांच्या नेतृत्वात नागपूर येथून काढण्यात आली आहे.ओबीसी बांधवांचा विविध मागण्यांसाठी हि यात्रा निघाली असून या यात्रेचे हिंगणघाट शहरात आगमन झाले असता राष्ट्रवादीचे नेते अतुल वांदिले यांनी स्वागत केले. यावेळी मंडळ जनगणना यात्रेचे संयोजक उमेश कोराम, ओबीसीसेवा संघ जिल्हाध्यक्ष चंद्रपूर अनिल डहाके, संयोजक कृतल आखरे, आकाश वैद्य, सुभाष उके यांचे शाल व वृक्ष देऊन स्वागत करण्यात आले.
केंद्र सरकरने ओबीसी समुदायासाठी स्वतंत्र कॉलम देऊन जातीनिहाय जनगणना करावी, शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी द्यावी, विद्यार्थ्यांना सर्व अभ्यासक्रमात १०० टक्के शिष्यवृत्ती द्यावी, एक लाख पदांचा बॅकलॉग तात्काळ भरावा आदी मागण्यासाठी मंडल जनगणना यात्रा निघाली असल्याचे मत संयोजक उमेश कोराम यांनी मांडले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ओबीसी बांधकांचा विविध मागण्यांसाठी समोर येऊन नेहमी प्रश्न मांडत असते असे मत राष्ट्रवादीचे नेते अतुल वांदिले यांनी केले.
याचे प्रास्ताविक निलेश गुल्हाने यांनी केले तर सूत्रसंचालन प्रशांत घवघवें व आभार गजानन गलांडे यांनी मानले.यावेळी ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवें, सौ.मायाताई चाफले, राजेंद्र ईखार, निलेश गुल्हाने, सुरेश गुंडे, दशरथ ठाकरे, गजानन गलांडे, अनिल लांबट, अवचट सर, सचिन येवले, अजय मुळे, संजय भुते, किशोर मुडे, संदीप भजभूजे, मारोती जयपूरकर,नरेश तराळे,निलेश भजभूजे, प्रशांत बाकडे,राजू मुडे तसेच सर्व ओबीसी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

