संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- WCL सास्ती सबेरिया येथील कार्यरत असणारे श्री नामदेव गौरकार यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सत्कार व निरोप समारंभ कार्यक्रम नक्षत्र सेलिब्रेशन हॉल राजुरा येथे संपन्न झाला.
त्यावेळी माजी नगराध्यक्ष श्री अरुण भाऊ धोटे यांच्या हस्ते नामदेव गौरकार यांचे शॉल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. या सोबत याप्रसंगी सतीश भाऊ धोटे पत्रकार भीमय्या बोर्डेवार, , सागर भटपल्लीवार, तसेच अनेक सहकारी मंडळी उपस्थित राहून नामदेव गौरकार यांना सुख समृद्धी-व पुढील आयुष्य आरोग्यदायी सुखी जाओ ही शुभेच्छा दिल्या.

