सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
बल्लारपूर:- जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे दिनांक:03/10/ 2022 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न लालबहादूर शास्त्री आणि शहीद भगतसिंग यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री. बी. बी. भगत सर (मुख्याध्यापक), प्रमुख पाहुणे श्री. एम. डी. टोंगे सर (माजी मुख्याध्यापक), श्री. यु. के. रांगणकर सर (विज्ञान शिक्षक), प्रमुख उपस्थिती श्री. आर. के. वानखेडे सर, श्री. आर. बी. अलाम सर यांची होती. प्रथमत: मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न लालबहादूर शास्त्री तसेच शहीद भगतसिंग यांच्या फोटोला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमात कु. त्रिशाली महानंद, कु. राधिका आत्राम, कु. सिया देवगडे, अरहान शेख, अथर्व हीकरे, कु. श्रावणी मत्ते या विद्यार्थ्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न लालबहादूर शास्त्री आणि शहीद भगतसिंग यांच्या जीवनावर आपल्या भाषणातून प्रकाश टाकला. या कार्यक्रमामध्ये “मेरा रंग दे बसंती चोला”, भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्यावर आधारित गीत, आणि “वैष्णव जन तो तेने कहिये” हे गीत वाजवून दाखवण्यात आले.
या कार्यक्रमामध्ये श्री. यु. के. रांगणकर सर, श्री. एम. डी. टोंगे सर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. आर. बी. अलाम सर, संचालन सौ. एस. एन. लोधे मॅडम व आभार प्रदर्शन श्री. एस. एम. चव्हाण सर यांनी केले. कार्यक्रमांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी श्री. जे. आर. कांबळे, श्री. डब्ल्यू. आर. बोबडे, श्री. डब्ल्यू. बी. खोंडे, श्री. एस. एन. मोरे, श्री. आय. एम. अडबाले, श्री. विजय कोंगरे व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.

