पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रतिनिधि
युनिट ४ गुन्हे शाखा, पुणे शहर
पुणे : खडकी पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र.गु.र.नं. २३५ / २०२२ भादवि कलम ३०७, १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४,
भारताचा हत्यार कायदा कलम ४(२५) महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ३७ (१) (३) १३५, क्रिमिनल अॅमॅन्डमेन्ट अॅक्ट कलम ७ या गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्ह्यातील पाहिजे आरोपींचा शोध घेणेकामी पोलीस निरीक्षक गणेश माने,गुन्हे शाखा युनिट-४, पुणे शहरकडील पथकाने दाखल गुन्ह्याचा समांतर तपासास सुरूवात केली. त्या अनुशंगाने युनिट-०४ पथकातील पोलीस अंमलदार यांना त्यांचे गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपी 4) आकाश लोखंडे २)अजय ऊर्फ करण बालाजी सावंत ३) विजय ऊर्फ अर्जुन
बालाजी सावंत हे तीचे गुन्हा करून, त्यांचे मुळगाव-मद्रापुर, ता. आंबेजोगाई, जि. बीड येथे पळुन गेले आहे. सदर आरोपी यांचे ठावठिकाणाबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने गुन्हे शाखा युनिट-०४ कडील पथकाने बातमीचे ठिकाणी जावुन पाहिजे
आरोपी आकाश बंडु लोखंडे, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर, पुणे यास त्याचे मुळ गावातून ताब्यात घेतले. तसेच इतर दोन
पाहिजे आरोपी सावंत बंधु यांना पोलीस आलेचा सुगावा लागताच ते तेथून पसार झाले.
ताब्यात घेतलेल्या आरोपीने सावंत बंधु हे पुण्यास पळुन गेले असलेबाबत सांगितल्यानंतर भद्रापुर, ता. आंबेजोगाई, जि.बीड येथून पसार झालेले पाहिजे आरोपी खडकी रेल्वे स्टेशन येथे आल्याची गोपनीय माहिती मिळालेल्या प्राप्त बातमीवरून पथकाने खडकी रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचुन गुन्ह्यातील पाहिजे आरोपी १) अजय ऊर्फ करण बालाजी सावंत २ ) विजय ऊर्फ अर्जुन बालाजी सावंत दोन्ही रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर, पुणे यांना ताब्यात घेतले आहे.
नमुद तीन्ही आरोपीतांना पुढील कारवाई करीता खडकी पोलीस ठाणे, पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे. पुढील तपास खडकी पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगिरी ही मा.पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे, श्रीनिवास घाडगे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे- २ श्री. नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री गणेश माने, सहा पोलीस निरीक्षक, • विकास जाधव, पोलीस उप-निरीक्षक जयदीप पाटील, पोलीस अंमलदार, महेंद्र पवार, रमेश राठोड, संजय आढारी, अजय गायकवाड या पथकाने केलेली आहे.
