जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार व प.स.समितीचे माजी उपसभापती सौ. सोनाली कंकडालवार यांच्या कडून महाप्रसादाचे आयोजन.
✒️मधुकर गोंगले, अहेरी तालुका प्रतिनिधी
अहेरी:- सर्वत्र नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. आलापली येतील माँ वैष्णवधाम दुर्गा मंदिरात अष्टमीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी जमा झाले होते. सर्वांनी भक्ती भावाने माँ वैष्णवधाम दुर्गा मातेची पूजा अर्चना करून मातेला वंदन केलं.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार व त्यांची अर्धांगीनी माजी उपसभापती सौ. सोनालीताई कंकडालवार यांच्या वतीने सर्व भाविक भक्तासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकडो नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी मॉं वैष्णवी दुर्गा मंदिर आलापल्ली मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष मंडळाचे सदस्य व गावकरी उपस्थीत होते.

