अमरावती जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अमरावती:- राज्यात सर्वत्र आपल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. मात्र लाडक्या गणरायाला निरोप देताना काही ठिकाणी दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले आहे. यात अमरावती जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या घडलेल्या घटनांमध्ये तिघांचा विसर्जनावेळी बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेने गणपती विसर्जनाच्या उत्साहात दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
10 दिवस श्रद्धाभावने पूजा अर्चना करून लाडक्या गणरायाचे विसर्जन करून भावपूर्ण निरोप देण्यात आला. ढोल ताश्याच्या गजरात मिरवणूक काढत बाप्पाला विसर्जित करण्यात आले. मात्र या विसर्जनावेळी काही ठिकाणी दुर्दैवी घटना घडल्या असून नदीवर विसर्जनासाठी गेले असता पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना राज्यात ठिकठिकाणी घडल्या आहेत. अशीच घटना अमरावती जिल्ह्यात देखील घडल्या आहेत.
विसर्जन वेळी दोन तरुणांना जलसमाधी: आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देताना गणपती विसर्जनाला अमरावती जिल्ह्यात नदीपात्रात बुडून वेगवेगळ्या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाल्याने शोककळा पसरली आहे. यात धामणगाव रेल्वे तालुक्यातील वाघोली येथे युवक करण चव्हाण वय 22 वर्ष गणपती विसर्जनच्या वेळी त्याचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला आणि पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. दुसऱ्या घटनेत मेळघाटमध्ये धूळघाट रोडवर गडगा नदी पात्रात गणेश विसर्जना वेळी अनिल माकोडे हा युवक वाहून गेला आहे.
चंद्रभागा नदीत तरुणीला जलसमाधी: तर तिसऱ्या घटनेत दर्यापूर शहरातील चंद्रभागा नदीपात्रात गणपती विसर्जनासाठी गेलेली तरुणी मुक्ता श्रीनाथ वय 32 वर्ष या तरुणीचा खोल पाण्यात गेल्याने मृत्यू झाला. या तिन्ही घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. या घटनांमुळे गणेश विसर्जनाच्या उत्साहात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे या घटनेमुळे अमरावती जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

