🖋️ मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
देवळालीकॅम्प :- संसरी गावात उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई राबवत पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या निदर्शनानुसार स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत संसरी गावात ग्रामपंचायती परिसरात राबविण्यात आली. एस व्ही के टी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विजय मेधणे यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पंचायत समिती गटविकास अधिकारी सारीका बारी यांच्या समन्वयातून गावात महा श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबवून परीसर स्वच्छ करण्यात आला. त्यानंतर उघड्यावर कचरा टाकू नये. नियमित घंटागाडीतच कचरा टाकावा. नदीपात्र स्वच्छ ठेवावे. परिसरात कचरा टाकू नये. असे आवाहन करण्यात आले. तसेच आवाहनाचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे सांगण्यात आले आहे.
यावेळी गावातुन जनजागृती फेरीच्या माध्यमातून नागरिकांना स्वच्छ संसरी सुंदर संसरी असा संकल्प देण्यात आला. त्याचप्रमाणे नियमांचे पालन न करणाऱ्यांना आणि आरोग्यास बाधा निर्माण करणाऱ्यांना ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी अरुण आहेर यांनी आठ जणांविरोधात कारवाई करत पाच हजार रुपये दंड ठोठावला. गावकऱ्यांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन सरपंच विनोद गोडसे, उपसरपंच शेखर गोडसे, सदस्य शैला गोडसे, धनश्री म्हैसधुणे, निता गोडसे, विमल गोडसे, अंजना गोडसे, मंदाबाई गोडसे, इंदुबाई गीते, प्रशांत कोकणे, संजय गोडसे, राजेश गोडसे, आकाश पठारे, विकास घागरे आदींनी केले आहे.