अनिल अङकिने सावनेर तालुका प्रतिनिधी.
माे.नं-९८२२७२४१३६
सावनेर: स्थानिक माळी समाज बांधवांच्या वतीने संत शिरोमणी सावता महाराज यांचा तीन दिवसीय पुण्यतिथी महोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमातून सोमवारपासून साजरा केला जात आहे.
सोमवारी सकाळी ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर पुरुषोत्तम घोळसे यांच्या हस्ते श्री ची स्थापना व ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी माळी समाज पंच कमिटीचे प्रशांत घोळसे, मंगेश चरपे, सुनील चापेकर,दिवाकर नारेकर, मधुकर घोळसे,चंद्रशेखर बनाईत, शेषराव वाढीकर,उमाकांत भुडके, उत्सव समितीचे हरिदास सातपुते, पिंटू सातपुते, शुभम बनकर, मंगेश चरपे,गौरव बनकर, हिमांशू चाफेकर, रोहित निकाजू, कृणाल गायधने,रितेश बनकर, सुहास चरपे, सुरेश चरपे,मनोहर घोळसे,सुनील वाडबुधे, अभिषेक सातपुते, बंटी सातपुते, कमलाकर चरपे, मनोज नारेकर, शेषराव बनकर, पंकज सातपुते, पंकज गायधने, वसंता चापेकर, महतपुरे गुरुजी आदींसह अन्य समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी अतुल मेहत्रे व माजी नगरसेवक सुनील चाफेकर यांच्या हस्ते बुधवारी दुपारी गोपाल काल्याचे किर्तनानंतर श्रीच्या पालखीचे पूजन करून शहरात पालखीची दिंडी यात्रेसह मिरवणूक निघणार आहे. समारोपीय कार्यक्रमात माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे, महात्मा फुले शिक्षण संस्थेचे संचालक राजेंद्र वाघ, पोलीस निरीक्षक मारुती मुळूक आदी मान्यवरांच्या उपस्थितीत उत्सवातील सहभागी भाविकांना नारळ पान देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवहान क्षत्रिय लोणारे माळी समाज पंच कमिटी व कार्यक्रमातील उत्सव समितीने केले आहे.