मधुकर गोंगले, उपसंपादक
मो. नं. 9420751809.
*कुरखेडा :-* मूळ गाव देऊळगाव येतील व सध्या कुरखेडा येथे वास्तव्यास असणाऱ्या साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या संगीता संतोष ठलाल शेतकरी व गृहिणी महिला असून त्यांनी दैनंदिन लिखाणासोबतच अनेक सामाजिक उपक्रम सुध्दा राबवले आहेत. त्यांच्या सामाजिक, साहित्यिक नि:स्वार्थ सेवा बघून रेडिओ आकाशवाणी केंद्र नागपूर येथे त्यांची मुलाखत झालेली आहे, २३ सप्टेंबरला दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर सुद्धा मुलाखत झालेली आहे, पंतप्रधान कार्यालय दिल्ली येथून त्यांना पत्र आलेला आहे, भारत सरकारच्या साहित्य अकादमी दिल्लीच्या वतीने तसेच माध्यमिक आश्रम शाळा चांदाळा येथे “ग्रामालोक” या कार्यक्रमात त्यांना आमंत्रित करण्यात आले होते.
सर्वच क्षेत्रात त्यांचा “रानभाज्यांच्या जगात” हा उपक्रम बहुचर्चेत असल्यामुळे त्यांची समाजात विशेष ओळख आहे. आणि याच उपक्रमाला पुस्तक स्वरूपात त्यांनी आणले आहेत. ५ वे झाडीपट्टी नाट्यसंमेलन आदर्श महाविद्यालय वडसा यांच्या प्रांगणात झालेल्या नाट्यसंमेलनात “रानभाज्यांच्या जगात” या पुस्तकाचे प्रकाशन ५ वे झाडीपट्टी नाट्यसंमेलनाचे उद्घाटक एडोकेट आशिष जयस्वाल अर्थ नियोजन, पुनर्वसन विधी व न्याय राज्यमंत्री म.रा.तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री, पद्मश्री डॉ.परशुराम खुणे,सिनेकलावंत चला हवा येऊ द्या फेम हास्यसम्राट भारत गणेशपुरे, ५ वे झाडीपट्टी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य के.आत्माराम, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम, माजी आमदार क्रिष्णा गजबे, नाट्यकलावंत नरेश गडेकर, मोतीलाल कुकरेजा आदर्श महाविद्यालय संस्थापक वडसा, सुरेंद्र सिह चंदेल, नाट्यकलावंत शेखर डोंगरे, मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते व असंख्य जनतेच्या उपस्थितीत संगीता संतोष ठलाल यांच्या “रानभाज्यांच्या जगात” या पहिल्याच पुस्तकाचे थाटात प्रकाशन झाले. साहित्य क्षेत्रातील या प्रकारची पहिलीच पुस्तक ठरणार आहे म्हणून या दुर्मीळ पुस्तकाला प्रस्तावना देणाऱ्या आदिवासी साहित्यिक व सामाजिक कार्यकर्त्या कुसुमताई अलाम यांनी दिले आहेत, पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, जेष्ठ साहित्यिक एडोकेट लखनसिंह कटरे,पत्रकार व साहित्यिक सुधीर अग्रवाल यांच्या शुभेच्छापत्र लाभले आहेत.
आजकाल खाद्यसंस्कृती बदलत चालल्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात राहून वाढणाऱ्या रानभाज्या, कंदमुळं, गावरान भाज्या या सर्व लोप पावत असल्यामुळे संगीता ठलाल यांनी या,सर्व वनस्पती, भाज्यांचे संशोधन करून एक पुस्तक तयार करून समाजाच्या हितासाठी त्यांनी हे महान समाजकार्य केले आहेत. “रानभाज्यांच्या जगात” या पुस्तकाचे प्रकाशन होताच या पुस्तकाचे अनेक लोकांनी स्वागत केले आहे सोबतच या दुर्मिळ असलेल्या पुस्तकाची मागणी वाढली आहे. मानवी जीवनाच्या व मुक्या प्राण्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरत असलेली ही पुस्तक संगीता ठलाल यांनी प्रचंड मेहनत घेऊन लिहिली आहे. त्यांच्या पुस्तक प्रकाशनाला सहकार्य करणारे प्रा.राजकुमार मुसणे,नाट्यकलावंत, गायक अनिरुद्ध वनकर तसेच झाडीपट्टी नाट्यसंमेलनाच्या आयोजकांनी पुढाकार घेऊन सहकार्य केले. एवढ्या महान व्यक्तीमत्वाच्या हस्ते तसेच फार मोठ्या मंचावर पुस्तकाचे प्रकाशन झाले म्हणून संगीता ठलाल यांनी मंचावरील मान्यवरांचे, आयोजकांचे ५ वे झाडीपट्टी नाट्यसंमेलनाचे बहुसंख्येने उपस्थित असलेल्या रसिकांचे त्यांनी आभार मानले.

