अनिल अडकिणे सावनेर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. दुर्गादेवीच्या मूर्तीचे विसर्जन करताना तलावात बुडून एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तेलकामठी शिवारातील केसरनाला तलावात शनिवारी रात्री 11.30 वाजताच्या दरम्यान घडली. शेषराव शामराव सोनवणे वय 44 वर्ष राह. तेलकामठी, ता. कळमेश्वर असे मयताचे नाव आहे.
दुर्गोत्सव संपल्या नंतर दुर्गा मंडळातील सदस्य व नागरिक दुर्गादेवीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी केसरनाला तलावावर गेले होते. विसर्जन करीत असताना तोल जाऊन मयत शेषराव पाण्यात पडले आणि बुडायला लागले. यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. पण नाका तोडत पाणी गेल्याने ते बुडाले. या घटनेची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सागर खर्डे, पोलिस निरीक्षक उमेश पाटील, हितज्योती आधार फाउंडेशनची टीम व गावकरी घटनास्थळी पोहोचले.
त्यांनीही शेषराव यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण, परिसरात अंधार असल्याने शोधमोहीम थांबवावी लागली. रविवारी सकाळपासून पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले. दुपारी 11.00 वाजताच्या दरम्यान मृतक शेषराव यांचा मृतदेहच मिळून आला. या घटनेचा पुढील तपास सावनेरचे पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहेत.

