मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया अंतर्गत राष्ट्रीय वूशु स्पर्धा 2025-26 श्रीनगर राज्य जम्मू द्वारा आयोजित दिनांक 27 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर ला जिल्हा क्रीडा संकुल श्रीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय वूशु स्पर्धांमध्ये क्रीडा भारती क्लब हिंगणघाट तथा द फायटर प्लॅनेट क्लब हिंगणघाट येथील सतरा वर्षाखालील खेळाडू जवेरीया सलीमोद्दीन शेख या खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवर तीन विरोधकांना बाद करत व दोन विरोधकांशी कठीण संघर्ष करत आणि अत्यंत सुंदर प्रदर्शन करत महाराष्ट्राला रजत पदक प्राप्त करून दिले आणि महाराष्ट्राचे तथा नागपूर विभागाचे वर्धा जिल्ह्याचे आणि हिंगणघाट तालुक्याचे नाव संपूर्ण भारतात गाजवले.
मिळालेल्या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य वूशु संघ कोच तसेच वर्धा जिल्हा वूशु क्रीडा अध्यक्ष नीलेश राऊत तसेच क्रीडा शिक्षक ठाकुर, सुशांत सिंह गहेरवार, फैजान शेख, निशांत येखंडे, कबीर महेशगौरी आणि महिला कोच कु. नम्रता दुबे कु. रूपाली क्षिरसागर सर्व शिक्षक यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन व कौतुक केले.

