डॉ प्रणय भाऊ खुणे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना.
मधुकर गोंगले, उपसंपादक
मो. नं. 9420751809.
चामोर्शी -दिनांक 11नोव्हेंबर 2025 तालुक्यातील मौजा हळदवाही,विकासपल्ली, रेगडी, घोट,भाडभीडी, आमगाव, चणकापूर,बिलासपूर, माडेआमगाव व तालुक्यातील इतर गावांमध्ये जंगलातील रानटी हत्तीने जोरदार धुमाकूळ घातलेला असून अक्षरशः थैमान घातलेला आहे आणि या रानटी हत्तीमुळे सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांचे शेतातील पिकाचे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेला आहे तरी या सर्व नुकसानाची पंचनामा करून वनविभागाने तात्काळ समस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी व तालुक्यामध्ये हौदोस घातलेल्या रानटी हत्तीला तात्काळ जेरबंद करावे व हवालदिल शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा अशी मागणी मुख्यवनसंरक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे यांनी केला आहे.

