जिल्हा नियोजन विभागातून जिल्हा खनिज निधी अंतर्गत जिल्ह्यातील समस्त तलावाचा खोलीकरण करिता निधी उपलब्ध करून द्यावा.
मधुकर गोंगले, उपसंपादक
मो. नं. 9420751809.
डॉ. प्रणय भाऊ खुणे. प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना.
गडचिरोली दिनांक 11 नोव्हेंबर 2025
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील गुरनोली येथील स्थाणिक मामा तलावास राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर प्रणय भाऊ पु
खुणे यांनी सदिच्छा भेट दिली व या तलावात यावर्षी गाळयुक्त शिवार गाळमुक्त धरण योजना अंतर्गत नाम फाउंडेशन द्वारे उत्कृष्ट कार्य करण्यात आला आला कार्यामुळे तलावाचा पाणीसाठा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे त्याचप्रमाणे या परिसरातील शेतकऱ्यांनी नेलेल्या गाळ मुळे शेती उत्पादन सुद्धा वाढलेला आहे याबद्दल डॉ. खुणे यांनी समाधान व्यक्त केले व गडचिरोली जिल्ह्यातील समस्त मामा तलाव जलसंधारण विभागाच्या वतीने खोलीकरण करण्यात यावे अशी मागणी केंद्र व राज्य सरकारला केली व प्रामुख्याने गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा नियोजन विभागातून खनिज विकास निधी अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील मामा तलाव खोलीकरण करण्यात यावा अशी मागणी केली यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे सल्लागार देवानंद भाऊ खुणे. भामरागड तालुका अध्यक्ष भीमराव वनकर गुरुजी. नितेश भाऊ खुणे व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

