दोन महिन्यांत काम न झाल्यास पत्रकार संघटना २ फेब्रुवारी २०२६ पासून साखळी उपोषणावर.
विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी मोबाईल क्र. 9421856931
एटापल्ली तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची झालेली अत्यंत दयनीय अवस्था आणि त्यामुळे नागरिकांना होत असलेल्या प्रचंड त्रासाविरोधात व्हाईस ऑफ मीडिया एटापल्ली या पत्रकार संघटनेने उपविभागीय अधिकारी यांना तीव्र शब्दांत निवेदन दिले आहे.
जर येत्या दोन महिन्यांत या रस्त्यांचे नूतनीकरण किंवा दुरुस्तीचे काम सुरू झाले नाही तर पत्रकार संघटना दिनांक २ फेब्रुवारी २०२६ पासून सार्वजनिक बांधकाम कार्यालय समोर साखळी उपोषण करणार आहे.
‘मृत्यूचा सापळा’ बनलेले रस्ते
एटापल्ली – देवदा – गडचिरोली (एटापल्ली ते देवदा पर्यंत)
एटापल्ली – जारावंडी
हेडरी – गट्टा
या तिन्ही प्रमुख मार्गांची अवस्था अत्यंत वाईट असून या रस्त्यांवरून प्रवास करणे म्हणजे रोज ‘जीव मुठीत घेऊन’ चालण्यासारखे झाले आहे.
*अपघातांची मालिका आणि आरोग्य संकट:*
रस्त्यांवरील मोठे खड्डे अपघातांना निमंत्रण देत आहेत. दररोज अपघात होत असून यात अनेक नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
सर्वात गंभीर बाब म्हणजे आरोग्य सेवा,गर्भवती महिला आणि नवजात बालकांना तालुका तसेच जिल्हा रुग्णालयात पोहचवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते ज्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो.खड्डेमय रस्त्यांमुळे रुग्णवाहिकेतच प्रसूती होण्याची वेळ येते ज्यामुळे रुग्ण आणि बाळांचे जीवन धोक्यात येते.
*संघटनेची मागणी आणि इशारा*
एटापल्ली व्हाईस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष रवींद्र रामगुंडेवार आणि संघटनेच्या सदस्यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाने.

