मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
अकोला :- १९९७-१९९८ या दहावीच्या बॅचचे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या तब्बल २७ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतरचे ‘स्नेहमीलन’ अकोला येथील हॉटेल विनस इंटरनॅशनल येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या दुर्मिळ भेटीमुळे विद्यार्थी आणि शिक्षक वृंदाच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, तसेच ८३ जणांची उपस्थिती या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरली.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापिका सौ. प्रतिभाताई देशमुख होत्या,तर ‘चला हवा येऊ द्या’ फेम सुप्रसिद्ध कवी, अभिनेते आणि टीव्ही कलाकार श्री. किशोर बळी हास्य सम्राट हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, ज्यामुळे कार्यक्रमाला एक खास रंगत आली.
या स्नेहमेळाव्यात उपस्थित शिक्षकवृंद श्री.भरणे सर यांनी मार्गदर्शन केले. श्री मुळे सर, श्री.काळे सर, श्री धडम सर, श्री.कलाल सर, श्री. महल्ले सर, श्री. पाटील सर , श्री.सांभारे सर, श्री.वाकडे सर,श्री दत्ता पाटील बोर्डे, श्री.दिवाकर बढे व इतर कर्मचारी उपस्थित होते. शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे २७ वर्षांनी झालेले हे मिलन अत्यंत भावूक आणि आनंददायी ठरले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले.
मान्यवर आणि शिक्षकवृंदाचे स्वागत शाल, बुके आणि स्मृतीचिन्ह देऊन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरिता बढे आणि मनोज गावंडे यांनी केले.
विनोद हंबर्डे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर हितेश जामनिक यांनी उपस्थितांचे आभार मानले. मंगलसिंग चव्हाण, संजय बढे, बाबा इंगळे, देवानंद जामनिक, राजेश रेवस्कर, राहुल वाघ, नरेंद्र वक्टे , प्रवीण पोहुरकर, अजित भदे, हरीदास अघडते, सुरेंद्र भदे, सुशांत जामनिक, गजानन नांदुरकर, दिगंबर बोर्डे, राजू शिंदे, श्रीकांत बोर्डे, संतोष चौरसिया, संघपाल लंकेश्वर, शुद्धोधन इंगळे,अनिल शिरसाठ, गणेश होले, सुभाष नागे , अनिल दिवनाले, चेतन गावंडे, संतोष लाळे, पुष्पा शेंडे, ज्ञानेश्वर खराटे, नितीन बडोदे, रामदास चव्हाण, अंगत सहारे, रामदास खंडारे, साहेबराव मेश्राम , दीपक मेश्राम, आशा बढे, अनिता ताथूरकर, दीपाली बढे, अर्चना बढे, रंजना रेवस्कर, लक्ष्मी बोर्डे, अर्चना शेळके, राजेश इंगळे, रामेश्वर गावंडे, सुधीर इंगळे, संजय होले, मनोज गेबड , प्रमोद तायडे कल्पना बोर्डे, कोकिळा आठवले, पंचशीला वानखेडे, सविता ढवळे, वर्षा बढे, वंदना तायडे, दीपाली काळबांडे, माधुरी बोर्डे, अर्चना बोर्डे, आणि इतर विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमात जे सहभागी होऊ शकले नाहीत त्यांनी खंत व्यक्त केली. ऋषिकेश गावंडे यांनी शुभेच्छा संदेश पाठवला. तर काही आजच्या डिजिटल युगात ऑनलाईन पद्धतीने अर्चना काळे यांनी पुणे, तर शारदा मालठाणे यांनी मुंबई येथून सहभाग नोंदवला.
मनोरंजनात्मक कार्यक्रम
यावेळी सर्व माजी विद्यार्थी-विद्यर्थिनींनी नृत्य (डान्स) सादर केले. तसेच गाणी आणि उखाणे म्हणण्याचा कार्यक्रमही रंगला. विशेषतः प्रत्येकाने आपल्या कुटुंबाचा परिचय करून दिल्यामुळे जुन्या मित्रांना एकमेकांच्या सद्यस्थितीची माहिती मिळाली. आपल्यातील दिवंगत विद्यार्थ्यांना आदरांजली वाहिली.
सकाळच्या सत्रातील कार्यक्रमांनंतर दुपारच्या जेवणाची उत्कृष्ट सोय करण्यात आली होती. २७ वर्षांपूर्वीचे वर्गमित्र आणि शिक्षक एकत्र भेटल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि हा दिवस सर्वांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला.

