मधुकर गोंगले उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
*बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी मा. गणपतराव तावाडे यांना दिनांक ९ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी सुमारास आलापल्ली येथे गंभीर अपघात झाला. या दुर्घटनेत त्यांच्या डोक्याला तीव्र दुखापत झाली असून त्यांना तातडीने चंद्रपूर येथील डॉ. अजय मेहरा यांच्या रुग्णालयात हलविण्यात आले.*
*वैद्यकीय उपचारादरम्यान दिनांक ०९/१२/२५ रोज रात्री तावाडे यांच्यावर मेंदूवर मोठे ऑपरेशन करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून ते कोमामध्ये असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. पुढील २५ दिवस आयसीयू उपचारांची आवश्यकता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.*
*उपचारांसाठी आतापर्यंत २ ते ३ लाख रुपयांहून अधिक खर्च झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. खर्चाचा भार वाढत असल्याने तावाडे यांच्या उपचारासाठी समाजातील सर्वांनी मानवी दृष्टिकोनातून मदतीचा हात पुढे करावा, अशी कळकळीची विनंती करण्यात आली आहे.*
*आपल्या व्हाट्सअॅप समूहात जर १०० लोक असतील आणि त्यातील केवळ ५० जणांनीही ₹५०० किंवा ₹१००० इतकी मदत केली, तर ₹२५,००० ते ₹५०,००० तात्काळ जमा होऊ शकतात. अशा १० समूहांमध्ये हा संदेश पोहोचला तर किमान ₹२,५०,००० इतकी मदत सहज उपलब्ध होऊ शकते. या रकमेने त्यांच्यावर सुरू असलेली आपत्कालीन वैद्यकीय उपचारप्रक्रिया सुरळीत राहण्यास मोठी मदत होईल.*
*मी स्वतः हा संदेश माझ्या पाच व्हाट्सअॅप समूहांमध्ये पाठवत आहे.*
*आपणही हा संदेश पुढे पाठवून आणि शक्य ती आर्थिक मदत करून या कठीण प्रसंगी सहकार्य कराल, अशी मनापासून विनंती.*
*जय भीम।*
*नमो बुद्धाय।* 🙏*फोन पे नंबर 9421729361*

