विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी 9421856931.
एटापली
तालुक्यातील जारावंडी येथे अंगणवाडी शिक्षिका पदभरती ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जारावंडी यांच्या मार्फत राबविण्यात आली असून सदर शाळा पीएम श्री योजनेअंतर्गत येते. याच योजनेच्या निधीतून निवड झालेल्या उमेदवारांना मानधन देण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र या पदभरती प्रक्रियेत अपारदर्शकता व मनमानी झाल्याचा आरोप करत काल मंगळवार, दि. 16 डिसेंबर 2025 रोजी ग्रामपंचायत कार्यालय जारावंडीसमोर बेमुदत उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे.
सदर उपोषण रेशमा मनोहर सिडाम, सविता नीलकंठ मोहूर्ले व प्रतिमा शंकर जराते यांच्या मार्फत केला जात आहे त्यांनी सांगितले की, सदर पदभरतीमध्ये शासनाने ठरवून दिलेले नियम, अटी, पात्रता निकष व गुणपद्धती स्पष्ट न करता शिक्षणातील टक्केवारीकडे दुर्लक्ष करून काही ठराविक उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. आम्ही पात्र असूनही आम्हाला डावलण्यात आले, असा गंभीर आरोप त्यांनी केला
आज उपोषणाला बसल्यानंतर दिवसभरात कोणताही ठोस निर्णय किंवा लेखी आश्वासन न मिळाल्याने उपोषण सुरूच राहणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, उपोषणस्थळी पोलीस विभागाचे अधिकारी तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जारावंडीचे मुख्याध्यापक यांनी भेट देऊन तडजोडीचा व तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र न्याय मिळेपर्यंत व पदभरती प्रक्रिया रद्द करून पारदर्शक पद्धतीने नव्याने भरती जाहीर होईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही,असा ठाम निर्णय उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला
संपूर्ण आंदोलन शांततेत सुरू असून या प्रकरणाकडे आता वरिष्ठ प्रशासनाचे लक्ष लागले आहे. या पदभरतीची निष्पक्�

