मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
भामरागड : तालुक्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भाग असलेल्या घोटपाडी येथील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार आणि महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ नाशिक संचालक मा.श्री.सैनूजी गोटा यांनी दौरा करून येथील गावकाऱ्यांसोबत संवाद साधत गावातील विविध समस्या त्यांनी जाणून घेतले.
त्यावेळी गावातील नागरिकांनी गांवात निर्माण झालेल्या पिण्याची पाण्याची समस्या,मुख्य पक्के रस्ते,नाली बांधकाम,असे अनेक प्रमुख समस्या असल्याचे नागरिकांनी सांगितले.येथील नागरिकांनी एकत्रित बैठक घेवुन अनेक विषयांवर चर्चा केली सदर चर्चेत विविध समस्या कंकडालवार यांच्या समोर मांडण्यात आले असता गावातील सर्व समस्यांची निराकरण करण्याचे प्रयत्न करू,असे आश्वासन यावेळी कंकडालवार यांनी गावकऱ्यांना दिली.
यावेळी भामरागड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत बोगमी,नगरउपाध्यक्ष विष्णू मडावी,तालुका उपाध्यक्ष प्रभाकर मडावी,राजू वड्डे माजी नगराध्यक्षा,निकिता पुंगाटी(P.A)दानू आत्राम,चिन्नू सडमेक,महेश वरसे,बिरजू तेलामी,किशोर कडंगा सरपंच ग्रामपंचायत होद्री,नंदू महाका सरपंच ग्रामपंचायत नेलगुंडा,प्रसाद कुड्यामी,प्रवीण मोगरकर,आकाश मोगरकर,कन्ना हेडो पाटील कोठी,लालसु हेडो सोसायटी अध्यक्ष कोठी,चरणदस मडावी,जयराम मडावी यांच्या सह काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गावातील समस्त नागरिक उपस्थित होते.

