मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420741809.
अहेरी राजनगरीतील युवा, तडफदार व अनुभवी नेतृत्व म्हणून ओळख असलेले, गोर-गरीब जनतेसाठी अहोरात्र झटणारे सामाजिक कार्यकर्ते *जावेद अली* यांची *राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या अल्पसंख्याक विभागाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी* निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष *महेशजी पटेल* यांच्या हस्ते ही नियुक्ती दि. १९ जानेवारी २०२६ रोजी चामोर्शी येथे आयोजित कार्यक्रमात नियुक्तीपत्र देऊन जाहीर करण्यात आली.
या प्रसंगी व्यासपीठावर
*प्रदेश अध्यक्ष प्रणय खुणे,*
*राष्ट्रीय प्रवक्ता तथा चायन समितीचे राष्ट्रीय नेते ज्ञानेद्र बिस्वास,*
*महाराष्ट्र प्रदेश महासचिव प्रकाश गेडाम,*
*विदर्भ अध्यक्ष आशिष पिपरे,*
*जिल्हा अध्यक्ष रमेश अधिकारी,*
*अहेरी विधानसभा अध्यक्ष रियाज भाई शेख,*
*जिल्हा सचिव प्रा. रतन दुर्गे,*
*जिल्हा उपाध्यक्ष महेश अलोणे* यांची प्रमुख उपस्थिती होती.
संपूर्ण विदर्भात मानवाधिकार क्षेत्रात प्रभावी कार्य करून वेगळी छाप निर्माण करणाऱ्या जावेद अली यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे खूप-खूप अभिनंदन.

