गुर्जा येथे भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन संपन्न.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809
*अहेरी* :- तालुक्यातील गुर्जा (पेरमिली) येथे आयोजित भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.या कार्यक्रमास परिसरातील नागरिक व क्रीडाप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
उद्घाटन प्रसंगी राजे साहेबांनी खेळाडूंशी संवाद साधताना ग्रामीण भागात क्रीडा क्षेत्रासाठी अपार संधी असल्याचे सांगितले.ग्रामीण युवकांमध्ये नैसर्गिक ताकद,चिकाटी व जिद्द असते.अशा क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून ग्रामीण युवकांच्या क्रीडा कौशल्याला व्यासपीठ देण्याचा प्रयत्न केला जात आहे,असे मत त्यांनी व्यक्त केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की,या व्हॉलीबॉल स्पर्धेमुळे ग्रामीण युवकांना आपले क्रीडा कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली असून भविष्यातील उत्कृष्ट खेळाडू घडविण्यास ही स्पर्धा निश्चितच प्रेरणादायी ठरेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या स्पर्धेत तालुक्यातील तसेच परिसरातील विविध गावांमधील अनेक संघांनी सहभाग नोंदविला असून सामने अतिशय चुरशीचे होत आहेत.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते कुमार अवधेशराव बाबा आत्राम,संजय शेडमाके,संदीप गावडे,महारू गावडे,शिवम गार्गम,राजेंद्र इष्टम,साईनाथ चंदनखेडे,अविनाश कोंडगुर्ले,शुभम दहागावकर,केसा तलांडी,पोच्चा मडावी,बंडू आत्राम यांच्यासह परिसरातील नागरिक, क्रीडाप्रेमी,युवक,आजी-माजी खेळाडू व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.!

