मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
*अहेरी:-* रमाई आवास योजनेचा अनुदान तत्काळ उपलब्ध करून लाभार्थ्यांना द्यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा नगरसेवक अमोल मुक्कावार यांनी समाज कल्याण गडचिरोलीचे सहाय्यक आयुक्त यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नगर पंचायत अंतर्गत सन 2023 24 या वर्षात अंदाजे 60 घरकुल रमाई आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेले होते व बहुतांश लाभार्थ्यांचे घरकुलाचे बांधकाम 70 टक्क्यांच्या वर झालेले आहे उर्वरित बांधकाम पूर्ण करणे करिता लाभार्थ्यांना अनुदान देणे गरजेचे आहे त्यामुळे नगरपंचायत क्षेत्रातील रमाई आवास योजनेतील निधी तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग गडचिरोली यांना अहेरी नगरपंचायतीचे नगरसेवक अमोल मुक्कावार यांनी निवेदनातून केली आहे.

