मधुकर गोंगले, उपसंपादक. मो. नं. 9420751809.
वन वैभव शिक्षण मंडळ अहेरी द्वारा संचालित नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय, मुलचेरा येथे दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी विद्येची देवी माता सरस्वती यांच्या पूजेचे भक्तिभावाने आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी माता सरस्वती यांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करून महाविद्यालयाचे माननीय डॉ. रणजीत मंडल, प्राचार्य यांच्या शुभहस्ते विधीवत पूजा-अर्चना करण्यात आली.
पूजेच्या वेळी महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. वैदिक मंत्रोच्चार, आरती व प्रसाद वितरण अशा धार्मिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.
यानंतर दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी माननीय प्राचार्य डॉ. रणजीत मंडल यांच्या मार्गदर्शनाखाली सरस्वती पूजेचे विसर्जन शांततामय व श्रद्धापूर्वक वातावरणात पार पडले. विसर्जन सोहळ्यात सर्व उपस्थितांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त व सांस्कृतिक जाणीव वृद्धिंगत होण्यास मदत होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालय प्रशासन, प्राध्यापकवृंद व विद्यार्थ्यांचे सहकार्य मोलाचे लाभले.

