मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
डॉ बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श भूमी दिक्षा भूमी देसाईगंज येथे ७७व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.भगवान गौतम बुद्ध व डॉ, बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर सम्यक जागृत बौद्ध महिला समितीच्या अध्यक्षा ममता जांभूळकर, जेष्ठ सदस्य गायत्री वाहाने तसेच समता सैनिक दलाच्या एस एस डी वंदना सहारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . उपस्थित असलेल्या सर्वांनी भारतीय तिरंग्याला सलामी देऊन सामूहिक राष्ट्रगान करण्यात आले आहे .त्यानंतर डॉ वंदना घोंगडे,समता दूत बार्टी यांनी भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेची उपस्थितांना शपथ दिली.कार्यक्रमाला समता सैनिक दल जूनी वडसा,हेटी, आंबेडकर वार्ड शाखेचे कमांडो, समितीचे सल्लागार मारोती जांभूळकर,विजय मेश्राम,विद्यानंद मेश्राम,नरेश वासनीक,पवन गेडाम,सूरज लिंगायत,उपाध्यक्ष रत्नमाला बडोले कोषाध्यक्ष कविता मेश्राम,सदस्य सरीता बारसागडे, जयश्री लांजेवार,सुनीता नंदागवळी, आशा रामटेके, दुर्गा रंगारी,मंदा शिंपोलकर, लीना पाटील, रश्मी गेडाम,लोकमत सखी मंचच्या कल्पना कापसे,सोमवती लंजे,यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाला शहरातील बहूसंख्य नागरिक उपस्थित होते.

