हनिशा दुधे चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनीधी मो. 9764268694
बल्लारपूर: चार वर्षांनंतर बल्लारपूर शहराची शान असलेल्या ऐतिहासिक गोंडराजे किल्ल्यावर राष्ट्रीय सण प्रजासत्ताक दिनानिमित्त उपनगराध्यक्ष देवेंद्र आर्य यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
चार वर्षांपूर्वी,१५/०८/२०२१ रोजी दिवंगत माजी उपनगराध्यक्ष मीना चौधरी यांच्या हस्ते ऐतिहासिक गोंडराजे किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले होते..
राज्य सरकारच्या नियमानुसार, बल्लारपूर नगरपरिषदेच्या उपाध्यक्षांकडून ऐतिहासिक गोंडराजे किल्ल्यावर ध्वजारोहण केले जाते.मात्र, चार वर्षे प्रशासक राजवट असल्याने, कोणत्याही लोकप्रतिनिधीने ऐतिहासिक गोंडराजे किल्ल्यावर ध्वजारोहण केले नाही.
चार वर्षांनंतर, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, बल्लारपूर नगरपरिषदेच्या निवडणुका झाल्या आणि देवेंद्र आर्य यांची उपनगराध्यक्ष म्हणून निवड झाली.
२६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०:३५ वाजता ऐतिहासिक गोंडराजे किल्ल्यावर उपनगराध्यक्ष देवेंद्र आर्य यांच्या हस्ते संपूर्ण राज्य सन्मानाने आणि गोंडराजे बल्हारशाह यांच्या वारसांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्षा अलका अनिल वाढई, मुख्याधिकारी विशाल वाघ, उपमुख्याधिकारी रवींद्र भंडारवार, संगीता उमरे, कार्यालयीन अधीक्षक नंदकिशोर सातपुते, माजी नगराध्यक्ष घनश्याम मूलचंदानी,स्थायी समिती सदस्या छाया मडावी व करुणा नरसिंग रेब्बावार, सभापती इस्माईल ढकवाला, प्रियंका थुलकर, पवन मेश्राम, नगरसेवक सुनील कुलदीवार, भास्कर माकोडे, रवी मातंगी, सिक्की यादव, मनोज बेले, सुमित डोहने, प्रणीत सातपुते, अविनाश मट्ठा, सलीम नबी नगरसेविका वैष्णवी जुमडे, शिल्पा चुटे, अंकुबाई भुक्या, मोना धानोरकर, वैशाली हुमणे, शारदा माकोडे, सुनीता जीवतोडे , रंजिता बीरे, काजल तोटावार,यांचा सह नगर परिषद बल्लारपुर चे अधिकारी,कर्मचारी,पोलीस दल, पत्रकार गण, प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

