विश्वनाथ जांभुळकर
तालुका प्रतिनिधी.
एटापल्ली : दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी, एटापल्ली यांच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणासह वनसंरक्षण, वनसंवर्धन व कृषी कामांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भामरागड वनविभागातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी श्री शैलेश मिना (भा.व.से.), उपवनसंरक्षक, भामरागड वनविभाग उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्री अमर राऊत (भा.प्र.से.), उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, एटापल्ली, श्री आकर्श बी.बी. (भा.व.से.), परिविक्षाधीन वनसंरक्षक, श्री चैतन्य कदम , उपविभागीय पोलीस अधिकारी, एटापल्ली, श्री दीपक रामटेके, सहाय्यक वनसंरक्षक, श्रीमती रेखा मोहुर्ले, नगराध्यक्षा, एटापल्ली तसेच भामरागड वनविभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी मंचावर उपस्थित होते.
यावेळी एटापल्ली शहरातील प्रतिष्ठित नागरिक व पत्रकार बांधवही मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी वनसंरक्षण, वनसंवर्धन तसेच विविध कार्ययोजनांमध्ये कार्यरत असलेल्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या योगदानाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनरक्षक कु. सुजाता अडगोपूलवार यांनी केले. प्रास्ताविक श्री महेंद्र भांगर, वनपरिक्षेत्र अधिकारी (परिविक्षाधीन) यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री संजय रामगुंडवार, वनपाल यांनी केले.
या यशस्वी कार्यक्रमासाठी श्रीमती निलिमा खोब्रागडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, एटापल्ली व श्री महेंद्र भ�

