विश्वनाथ जांभुळकर तालुका प्रतिनिधी मोबाईल क्र 9421856931.
एटापल्ली – आज दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय एटापल्ली येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. ध्वजारोहणापुर्वी संविधानातील उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.उद्देशिकेचे वाचन प्रा. डाॅ. बाळकृष्ण कोंगरे यांनी केले. त्यानंतर स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य मा. दत्तात्रेय सावकार राजकोंडावार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. डाॅ. संदिप मैंद यांनी केले. याप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रमात प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन बुटे तथा समस्त प्राध्यापक तथा शिक्षकेतर कर्मचारी वृंद तथा बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
