मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
*अहेरी:-* अहेरी नगरपंचायत अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेचा अनुदान व माहिती घेण्यासाठी गडअहेरी व चेरपल्ली येथील नागरिकांनी अहेरी नगरपंचायतीचे नगरसेवक अमोल मुक्कावार व सामाजिक कार्यकर्ते अमोल रामटेके यांची भेट घेऊन विचारणा केली आहे, रविवार दिनांक 01 फेब्रुवारी रोजी नगरसेवक अमोल मुक्कावार यांच्या राहत्या घरी गावकरी जमा होऊन मदतीचा हाक मारले असून त्यांनी सर्वांना आपल्या पटांगणात बसवून विविध योजनांची माहिती दिली आहे.
एकीकडे नागरिकांना योजनांची माहिती नाही प्रत्येक प्रभागात लोकप्रतिनिधी असताना देखील नागरिकांची ओढ मात्र अमोल मुक्कावार यांच्याकडेच असल्याचे निदर्शनास येत आहे. घरी आलेल्या समस्त गावकऱ्यांची कामे रविवार असूनही त्यांना माहिती देऊन मी स्वतः सोबत राहून उद्या सोमवारी करून देणार असे आश्वासन नगरसेवक अमोल मुक्कावार व सामाजिक कार्यकर्ते अमोल रामटेके यांनी दिले असल्याने गावकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

