मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
गडचिरोली ==
वित्त वर्ष 2026 ते 2027 वार्षिक बजेट जो बनविला गेला आहे तो भारत देशाच्या 140 करोड जनतेच्या विकासाचा आणि हिताचा विचार केला गेला आहे म्हणजेच युवा वर्ग महिला वर्ग,बचत गट शेतकरी, शिक्षण, आरोग्य,बँकिंग क्षेत्र, रेल्वे विभाग ते टॅक्स सूट, लखपती दीदी, घरकुल, हाईवे रोड मॅप सर्वांच हित पाहूनच इतका व्यापक बजेट सबका साथ सबका विकास विचारात घेतला आहे. ज्यामुळे देशाचे उन्नतीचे आणि प्रगतीचे दार मोकळे होईल आणि त्याची गती झापाट्याने वाढेल तसेच महिलांच्या सक्षमीकरणाबद्दल सुद्धा खूप मोठा भर दिलेला आहे. शेतकरी बांधव सुजलाम सुफलाम झाला पाहिजे करिता शेतकऱ्यांसाठी विशेष बजेट दिल्या गेला आहे. नवी गती नवी उर्जा युवाशक्तीचा युवा संकल्प युवा गती युवा वर्गांना रोजगार उपलब्ध होईल करिता प्राधान्य दिला गेला आहे. बजेटमध्ये सेक्टर लीडर्स क्रियेटर्स तयार झाले पाहिजे. आत्मनिर्भर भारत बनला पाहिजे या देशात लघुउद्योग कुटीर उद्योग मोठ्या प्रमाणात उभे झाले पाहिजे .आणि जगाच्या पाठीवर हा भारत देश तिसरा अर्थव्यवस्था बनण्यासाठी ही तयारी या अर्थसंकल्पामध्ये यावर्षी करण्यात आलेली आहे. इतका चांगला देशाच्या हिताचा सुंदर वार्षिक बजेट माननीय केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमन जी तथा भारत देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी बनविला आहे करिता मी रेखाताई डोळस प्रदेश सचिव महिला मोर्चा भाजपा खूप खूप आभार मानते कौतुक करते आणि कोटी कोटी धन्यवाद सुद्धा करते.

