डॉ. प्रणय भाऊ खुणे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
दिनांक 4 फेब्रुवारी 2026
पंचायत समिती चामोर्शी अंतर्गत गट ग्रामपंचायत घोट येते केंद्र शासनाच्या जनजीवन मिशन अंतर्गत हर घर जल पाणीपुरवठा योजनेसाठी 22 कोटी रुपये खर्च करण्यात आले परंतु एवढा मोठा निधी खर्च होऊन सुद्धा सदर योजना आजपर्यंत प्रभावीपणे कार्यान्वित झाली नाही व येथील नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात पायपीट करावी लागत आहे त्याचप्रमाणे नवीन नळ कनेक्शन देताना अनेक घरापर्यंत थेट कनेक्शन न देता अर्धवट स्वरूपात जोडणी करण्यात आलेली आहे गावातील विविध वार्डामध्ये नळ जोडणी साठी करण्यात आलेल्या खोदकामामुळे गावातील रस्त्याची अवस्था खूप दैनिय झालेली आहे पाणीपुरवठासाठी वापरण्यात येणारे वाल्व रस्त्यावर उघड्यावर असल्याने अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून नागरिकांच्या दैनंदिन रहदारी साठी सुद्धा खूप मोठा अडचणी निर्माण झाला आहे ग्रामस्थांनी सदर काम पूर्ण व दर्जेदार झाल्याशिवाय प्रमाणपत्र देऊ नये अशी हरकत ग्रामपंचायत मध्ये नोंदवून सुद्धा काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र ग्रामपंचायतीने कोणत्या आधारावर दिले याची सुद्धा चौकशी होणे नितांत आवश्यक आहे गट ग्रामपंचायत घोट अंतर्गत कर्दूळ , निकतवाडा, पेठ व नवेगाव समाविष्ट असून या सर्व गावातील नागरिकांना जलजीवन मिशन अंतर्गत शुद्ध पिण्यासाठी पाणी पुरवठा टाकी उभारण्यात आले परंतु सदर पाणीपुरवठा योजना आज पर्यंत सलग एक महिना देखील चालली नाही व सदर पाणीपुरवठा योजना घोट वासियांसाठी पांढरा हत्ती ठरलेला आहे या पाणीपुरवठा योजनेची चौकशी करून शासनाने तात्काळ लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.प्रणय भाऊ खुणे , जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी जिल्हा जिल्हा कार्याध्यक्ष आसिफ सैय्यद जिल्हा उपाध्यक्ष नानू भाऊ उपाध्ये, माजी जिल्हा परिषद सदस्य नामदेव सोनटक्के, मानवाधिकार संघटन जिल्हा कार्याध्यक्ष आसिफ सय्यद, अविनाश पाटील, माजी पोलीस पाटील,रमेश शृंगारपवार,अश्विनी वडेट्टीवार रूम्पा शहा, पवन दुधवावरे, विलास उईके, विलास वडेट्टीवार, दिनेश मुजुमदार,ललिता कागदलवार विवेक खांडेकर, सुशीला आत्राम स्थानिक घोट येथील नागरिकांनी प्रधानमंत्री कार्यालय नवी दिल्ली, मा,मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,मा, ग्रामविकास मंत्री. मा, पाणीपुरवठा मंत्री, मा,खासदार. मा, आमदार, महोदय व मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यकारी गडचिरोली व अभियंता जल जीवन मिशन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हा गडचिरोली यांना आपल्या तक्रार निवेदनाद्वारे केली आहे.

