सल्ला शक्तीचे अनावरण व कोया पुनेम गोंडी धर्म संमेलन संपन्न.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
*अहेरी :-* तालुक्यातील पारंपारिक पेरमीली इलाखा पट्टी व कोडसेलगुडम यांच्या संयुक्त विद्यमाने सल्ला शक्ती चे अनावरण तसेच कोया पुनेम गोंडी धर्म संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले.या कार्यक्रमाचे उद्घाटन अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना राजे साहेब यांनी युवकांनी आपल्या समाजाची संस्कृती,परंपरा व धार्मिक मूल्ये जपणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. पुढे बोलताना त्यांनी समाजाच्या एकतेसाठी युवा पिढीने पुढाकार घ्यावा,असे आवाहन केले.
यावेळी पेरमीली येथील समाजाच्या प्रतिष्ठित नागरिकांनी राजे साहेबांचे शाल, व पुष्पगुछ देऊन स्वागत केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा नेते कुमार अवधेशराव बाबा आत्राम होते तर प्रमुख अतिथी म्हणून यावेळी माजी सरपंच प्रमोद आत्राम, डॉ.महेश मडावी,संबय्या करपेत,बालाजी गावडे,मूलचंद गावडे,संजय मेश्राम(शेंड्या), सरपंच किरणताई नैताम,संजय सडमेक,संदीप गावडे,गणपत मडावी,तुकाराम सडमेक, बापू सडमेक,विठ्ठल मेश्राम यांच्यासह परिसरातील गाव पाटील,ग्रामसभा पदाधिकारी,गावकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.!

