माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचाकडून स्पर्धेला प्रथम पारितोषिक.
मधुकर गोंगले, उपसंपादक
मो. नं. 9420751809.
भामरागड : तालुक्यातील कोहकापरी येथे यंग स्टार सी.सी.क्रिडा मंडळ कोहकापरी तर्फे भव्य ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे.सदर स्पर्धेचे उदघाटन येथील काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा हस्ते करण्यात आली आहे.
भव्य ग्रामीण क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव हनुमंतू मडावी कडून प्रथम पारितोषिक देण्यात आली आहे.
द्वितीय पारितोषिक भामरागड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत बोगमी,भामरागड नगरपंचायतचे उपाध्यक्ष विष्णू मडावी कडून तसेच तृतीय पारितोषिक यंग स्टार सी.सी.क्रिडा मंडळ कोहकापरी कडून देण्यात आली आहे.
यावेळी काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष लक्ष्मीकांत बोगमी,भामरागड नगरपंचायतचे उपाध्यक्ष विष्णू मडावी,डोलेश भाऊ(कंदोडी)राजू वड्डे,प्रभाकर मडावी,मनोज पोरतेट सरपंच,दानू आत्राम,चिन्नूभाऊ,भोंवरसाय मांझी,मनबात राणा,रामा भाऊ,वनेशभाऊ मडावी,क्रीडा अध्यक्ष गिल्ला उसेंडी,संबंरू हेमला,हरीश कुंजामी,विजय उसेंडी,गणेश राणा,सरिता कुंजामी यांच्या सह गावातील प्रतिष्ठित नागरिक,महिला,युवा वर्ग व स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते परिसरातील क्रीडा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते

