*lमाजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते विधिवत पूजन.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
*आलापल्ली :-* महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर आलापल्ली येथील शिवदत्त अय्यप्पा मंदिरात ‘महाशिव १२ ज्योतिर्लिंग महापडी शिवपूजा’ हा भव्य धार्मिक कार्यक्रम भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला.या पूजाविधीचे विधिवत पूजन अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी राजे साहेब यांनी आपल्या क्षेत्रातील जनतेच्या समस्या दूर व्हाव्यात,सर्वांच्या जीवनात सुख,शांती व समाधान नांदावे, अशी मनोभावे प्रार्थना भगवान शंकराच्या चरणी अर्पण केली.
पूजेनंतर राजे साहेबांच्या हस्ते उपस्थित शिवभक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.तसेच मंचेरियल येथील काली ग्रुपच्या भक्तीमय संगीताचा आस्वाद घेत उपस्थित भाविकांनी आध्यात्मिक आनंद अनुभवला.
या कार्यक्रमास श्री नरहरी शर्मा गुरुस्वामी, श्रीनिवास बिट्टीवार गुरुस्वामी,सुरेश स्वामी रामगिरवार,सुधाकर स्वामी उल्लीवार, संदीप स्वामी झाडे,मुनेश स्वामी आत्राम, तिरुपती स्वामी सप्पीडवार,जमुना स्वामी नैताम,नानय्या येलेश्वराम यांच्यासह अय्यप्पा मंदिर समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ व मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.!!

