काँग्रेस नेते अजय कंकडालवार यांनी अंत्यसंस्कार कार्यक्रमला उपस्थित व श्रद्धांजली अर्पण.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
अहेरी : गडचिरोली छत्तीसगड सीमेवरील अभुझमाड जंगलात नक्षलवाद्यांविरुद्ध लढताना अहेरीचे सुपुत्र C-60 पथक जवान दीपक चिन्न मडावी यांना वीरमरण प्राप्त झालं आहे.आज जवान दीपक मडावी यांचा जन्माभूमी असलेल्या मंड्रा,दमरांचा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार कार्यक्रम झालं आहे.
अंत्यसंस्कार कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित होत जवान दीपक मडावी यांना श्रद्धांजली अर्पण केले.
यावेळी अजय कंकडालवार सोबत विलास मडावी सरपंच,प्रमोद कोडापे,जे.टी.मडावी, मेडपल्ली सरपंच निलेश वेलदी,श्रीनू राऊत,जगन्नाथ मडावी,माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रमोद आत्राम,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे,माजी जि.प.सदस्य सुनीता कुसनाके,पिंट्टू मडावी,प्रवीण कोरेत,प्रमोद गोडसेलवार यांच्या सह आदी उपस्थित होते.

