मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोज शनिवारला ” वनवैभव शिक्षण मंडळ अहेरी” द्वारा संचालित भगवंतराव हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय अहेरी येथे मराठी गौरव भाषा दिन” व ” राष्ट्रीय विज्ञान दिन निमित्य भगवंतराव कनिष्ठ महाविद्यालय अहेरी येथील माजी विद्यार्थी श्री विलास बिच्चू गावडे( युपीएससी उतीर्ण व सध्या छत्तीसगढ येथे कार्यरत AC /DYSP असिस्टंट कमांडट या पदावर कार्यरत असलेले) यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री शाहीद शेख सर यांनी श्री विलास गावडे यांचा शाल व मानचिन्ह देऊन यशोचित गौरव केला. प्रमुख मार्गदर्शक पाहुणे श्री विलास गावडे यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की, सर्वांनी आपले उद्दीष्ट तयार करून अभ्यासातील सातत्य व कठोर मेहनत घेतली तर एमपीएससी व युपीएससी च्या स्पर्धा परीक्षेत यश नक्कीच मिळते हे सांगतांना त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी याबद्दल बहुमुल्य मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावरील प्रमुख अतिथी प्रा.उत्तम मुंगमोडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सर्वप्रथम प्रास्ताविक प्रा सुहास मेश्राम यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन कु. स्वरूपा आकुदरी व वेदिका यांनी केले . यावेळी सर्व प्राध्यापक, शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी मोठया संख्येनी उपस्थित होते.

