मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीतील प्रतिष्ठित Hotel Samrat येथे आयोजित भव्य सोहळ्यात जावेद अली यांना उत्कृष्ट पत्रकार आयकॉन अवॉर्ड 2026 प्रदान करून सन्मानित करण्यात आले. GAC Awards तर्फे आयोजित या पुरस्कार समारंभात देशभरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
पत्रकारितेच्या क्षेत्रात निष्ठा, प्रामाणिकपणा आणि समाजाभिमुख कार्याच्या जोरावर जावेद अली यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील प्रश्नांना त्यांनी सातत्याने वाचा फोडली असून सर्वसामान्यांच्या हक्कासाठी निर्भीड भूमिका मांडली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना ‘उत्कृष्ट पत्रकार आयकॉन अवॉर्ड’ देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी जावेद अली यांच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजातील सकारात्मक बदलासाठी जबाबदार पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. जावेद अली यांनी आपल्या लेखणी आणि वृत्तांकनातून समाजप्रबोधनाचे कार्य केले आहे.
या सन्मानामुळे त्यांच्या कार्याला राष्ट्रीय पातळीवर नवे बळ मिळाले असून मित्रपरिवार, सहकारी आणि चाहत्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
जावेद अली यांना मिळालेल्या या प्रतिष्ठित पुरस्काराबद्दल सर्व स्तरांतून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
