हिंगणघाट तालुका प्रतिनिधी
हिंगणघाट:- विद्युत महावितरण मंडळा तर्फे उर्जा महोत्सव समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्या निमित्ताने महावितरण विभागाला हिंगणघाट नगर पालिकेच्या नगरसेविका सौ.शुभांगी डोंगरे यांनी मागण्याचे निवेदन दिले.
महावितरण विभाग वर्धा जिल्हा यांच्या नावाने देण्यात आलेल्या निवेदनात, एक कर पावती असल्यास 2 दोन विधुुत कनेक्शन मिटर महावितरण तर्फे देण्यात येत नाही. त्यामुळे अनेक परीवराना नाहक त्रास सहन करावा लागतो. हा विषय सगळ्या ग्रामीण तसेच शहरातील नागरिकांचा असून मोठ्या प्रमाणात कित्येक घरात संयुक्त कुटुंब राहतात तरी काही घरामध्ये मुले आणि आई वडील वेगळे राहतात अश्या वेळी त्यांना वेगळ्या मिटर ची / विधुत कनेशची गरज असते. पनं विधुुत विभाग टॅक्स पावती व घर एक असल्या कारणाने मिटर देने टाळते. या मुळे मोठ्या प्रमाणात वाद वाढुन गरीब कुटुंबातील लोकांना अंधारात राहवे लागतात. तरी या प्रकरणी लक्ष देवुन पुर्वी प्रमाने एका कर पावती वर दुसरे मिटर कनेक्शन देण्यात यावे व ग्रामीण तसेच शहरातील जनतेला न्याय द्यावा असे या निवेदनात म्हटले आहे.