मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
अहेरी : ===
अहेरी तालुक्यातील जोगणगुडा येथील शेंकरा बोराकुट यांच्या घरी अचानक आग लागून मोठे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्या भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर) यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
यावेळी त्यांनी आगग्रस्त कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला व झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती जाणून घेतली. तसेच प्रशासनामार्फत शक्य ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासनही त्यांनी दिले.
या प्रसंगी अरुण वेलादी (सरपंच, मरपल्ली), शिक्षक यशवंत डोंगरे, वागा वेलादी, सदानंदजी, इस्माईल दादाभाई, एमडी शानू तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

