मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
स्वर्गीय चाचम्मा हकीम यांच्या स्मृतिप्रित्यर्थ न्यू स्टार क्रिकेट क्लब, वेलगूर यांच्या वतीने आयोजित रात्रकालीन 30 यार्ड क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. उद्घाटन मा. शाहीन भाभी हकीम (विभागीय अध्यक्ष, रा. का. पा. श. प.) यांच्या हस्ते झाले, तर सहउद्घाटक म्हणून मा. बबलू भैय्या हकीम उपस्थित होते**
**स्पर्धेमुळे परिसरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले असून युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यावेळी मान्यवरांनी खेळाडूंना क्रीडाभावनेने खेळण्याचे आवाहन केले**
**स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे. प्रथम पारितोषिक म्हणून ₹35,001 रोख रक्कम व चषक (मा. सौ. भाग्यश्रीताई आत्राम हलगेकर यांच्या तर्फे), द्वितीय पारितोषिक मा. शाहीन भाभी हकीम यांच्या तर्फे 25001 रोख तर तृतीय पारितोषिक न्यू स्टार क्रिकेट क्लबतर्फे 15001 देण्यात येणार आहे**
**उद्घाटनप्रसंगी सरपंच किशोर भाऊ आत्राम, उपसरपंच उमेश मोहूर्ले, रोहित गलबले, आदिल भाऊ पठाण, डॉ. गलबले, डॉ. हलदर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते**
**कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर मराठे यांनी केले, तर आभार प्रदर्शन दिलीप राऊत यांनी मानले**
