मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809
अहेरी
आज अहेरी येथील कन्याका देवी मंदिरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने पंडित दिन दयाल उपाद्यय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या भव्य दिव्य कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा जेष्ठ पत्रकार जावेद अली यांनी *माजी राज्य मंत्री राजे अंबरीशराव महाराज यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शेकडो कार्यकर्ता सह जाहीर प्रवेश केले. यावेळी जावेद अली सैय्यद यांच्या प्रवेशाने अहेरी विधानसभा मतदारसंघात फार मोठा अल्पसंख्याक वर्ग असल्याने याचा फायदा भाजपला नक्कीच फायदा होणार असल्याचे चर्चा सुरू झाल्याचे दिसून येत आहे.* सैय्यद जावेद अली यांचा ग्रामीण भागात चांगला जनसंपर्क असून तसेच सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात.जावेद अली यांच्याभाजप प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ला फार मोठा धक्का बसला असून याचा परिणाम येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीला धक्का बसणार. आणि अनुभवी, अभ्यासू कार्यकर्ता म्हणून ओळख असलेल्या जावेद अली भाजपाचा झेंडा हातात घेतला.या कार्यक्रमात गमंचावर उपस्थित माजी खासदार अशोक नेते. जेष्ठ नेते बाबुरावजी कोहडे. जिल्हा अध्यक्ष रमेश बारसागडे. जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम. नगर सेवक आशिष पिपरे. महिला जिल्हा महा मंत्री शालिनी पोहनेकर. माजी. जी. प. अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे मंचावर उपस्थित होते यावेळी *माजी राज्य मंत्री राजे अंबरीशराव महाराज* यांनी यावेळी उपस्थित प्रशक्षणार्थिना मार्गदर्शन करतांना म्हणाले कि. भारतीय जनता पक्षाचे मुख्य कार्य म्हणजे जनते पर्यन्त पोहचून जनतेचे काम करणे होय.शेवटच्या घटका परेंत पोहून जनतेला मदत करा. जर काम करीत असतांना अडचन येत असेल तर मला सांगा.
जे कार्यकर्ता भाजपा सोडून गेले असेल जर परत येत असेल तर आपण स्वागत करू. प्रत्येक कार्यकर्ता कामाला लागा. कोण काय करीत आहे हे मला माहीत आहे. कुणीही रोकण्याचे प्रयत्न केले असे मला माहिती मिळाल्यास मी सोडणार नाही.कोण काय करतो हे मला सांगू नका. पद असूनही काम करत नसाल तर पद सोडून दया जे काम करतात त्याना पद देऊ. असे समारोपिय मार्गदर्शन करतांना माजी राज्य मंत्री राजे अंबरीशराव महाराज बोलत होते.यावेळी मोट्या संखेत विविध पक्षचे कार्यकर्ते भाजप मध्ये प्रवेश केल्याने एकच चर्चा जिल्यात सुरु आहे. यावेळी हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

