डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शाल-श्रीफळ देऊन गौरव; विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी संदेश.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
अहेरी : महाराष्ट्र पोलीस भरती २०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या भगवंतराव हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, अहेरी येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
यामध्ये यासिन सय्यद, अलिशा सय्यद, तृप्ती इप्पावार, काजल सामरे, प्रथमेश तलांडी आणि आलोक पुरोहित या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य शाहीद शेख यांनी भूषविले. त्यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल झाले असून, उपस्थित शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
सत्कारमूर्ती विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात महाविद्यालयातील शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि स्वतःची जिद्द व कठोर परिश्रम हेच यशामागील मुख्य घटक असल्याचे सांगितले. तसेच, त्यांनी इतर विद्यार्थ्यांना मेहनत, शिस्त आणि सातत्य ठेवण्याचा सल्ला देत स्पर्धा परीक्षांसाठी नियोजनबद्ध अभ्यासाचे महत्त्व अधोरेखित केले.
तसेच वन वैभव मंडळाचे सचिव मा. अब्दुल जमीर हकीम व शाहीन भाभी हकीम यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमामुळे उपस्थित विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली असून, भविष्यात अधिक यश मिळवण्यासाठी त्यांच्यात नवचैतन्य निर्माण झाले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

