मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
गुड्डीगुडम- दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा गुड्डीगुडम येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी शाळेच्या वतीने गावातून भव्य प्रभातफेरी काढण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक वाल्मिक घोडाम यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांनी म्हणाले की, बाबासाहेब यांनी देशाला संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला.शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे त्याचे विचार विद्यार्थ्यांनी आत्मसात केले पाहिजे.त्यांचे विचार प्रत्येकाने अंगीकारले पाहिजेत, प्रत्येक विद्यार्थाने त्यांना आपले आदर्श मानले पाहिजेत असे ते म्हणाले. यावेळी शिक्षक विक्की ब्राम्हणे, सहारे,आत्राम,अधिक्षिका ज्योत्सना कानावर, विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय कोतकोंडावार यांनी सहकार्य केले.

