मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
अहेरी (दि. 14 एप्रिल 2026) : अहेरी शहरातील उपजिल्हा रुग्णालयाजवळ असलेल्या “अम्मा चा चाय होटल” येथे आज माजी पालकमंत्री राजे अंब्रीसराव महाराज आत्राम यांनी अचानक भेट देत कार्यकर्त्यांसोबत चहाचा आस्वाद घेतला. त्यांच्या या साध्या आणि आपुलकीच्या भेटीमुळे परिसरात एक वेगळीच उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी त्यांच्यासोबत कुमार अवधेशराव बाबा आत्राम तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. माजी मंत्री आत्राम यांनी “अम्मा” यांच्याशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. “काही अडचण असल्यास मला नक्की कळवा,” असे आश्वासन देत त्यांनी आपुलकीची भावना व्यक्त केली.
राजे अंब्रीसराव आत्राम हे नेहमीच गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी तत्पर असलेले नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या राजवाड्यात येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला ते कधीच रिकाम्या हाताने पाठवत नाहीत, अशी त्यांची जनमानसात ख्याती आहे. कार्यकर्त्यांप्रती त्यांची असलेली बांधिलकी आणि मदतीची भावना यामुळेच ते अहेरी विधानसभा क्षेत्रात अत्यंत लोकप्रिय नेता ठरले आहेत.
आजच्या या साध्या चहापानाच्या कार्यक्रमातून त्यांनी पुन्हा एकदा “नेता म्हणजे जनतेचा माणूस” हे अधोरेखित केले. त्यांच्या या भेटीने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, स्थानिक नागरिकांनीही या कृतीचे मनापासून स्वागत केले आहे.
जावेद अली
पत्रकार अहेरी गडचिरोली

